मुंबई: मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महानगरात आरोग्यसेवा ही नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत समोर आलेले प्रकार हे फक्त निष्काळजीपणाचे नाहीत तर रुग्णांच्या जीवाशी केलेला थेट खेळ आहे.प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले व मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी उपआयुक्त (आरोग्य), श्री. शरद उखाडे यांची भेट घेऊन खालील तिन्ही गंभीर मुद्द्यांवर तातडीने ठोस कारवाईची मागणी केली.
बोगस डॉक्टर प्रकरण बी.एन. देसाई रुग्णालयासह इतर रुग्णालयांत बोगस डॉक्टर ICU मध्ये नेमल्याचा धक्कादायक प्रकार.हा प्रकार रुग्णांच्या जीवाला थेट धोका निर्माण करणारा; हा भारतीय न्याय संहिता कलम 420, 406, 468, 471, 304A, 336-338, 120B अंतर्गत फौजदारी गुन्हा आहे.संबंधित कंत्राटदाराविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवावा.सदर कंत्राटदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत (Blacklist) टाकावे.दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई करावी.
कूपर रुग्णालयातील उंदरांचा उपद्रव महिला रुग्णांना उंदराने चावा घेतल्याची घटना, त्यानंतर रुग्णालयातून २०–२२ उंदीर पकडले गेले.डागडुजीतील छिद्रे बंद न केल्यामुळे उंदरांना वॉर्डमध्ये प्रवेश.K.H.F.M. हाऊसकीपिंग एजन्सीवर कारवाईची प्रक्रिया अजूनही अपूर्ण.रिक्त कंत्राटी पदांमुळे कचऱ्याचे ढीग व उंदीर-डासांची पैदास.
तात्काळ व्यावसायिक पेस्ट कंट्रोल मोहीम.सर्व छिद्रे बंद करून उंदरांचा कायमस्वरूपी प्रवेश रोखावा.K.H.F.M. एजन्सीला काळ्या यादीत टाकावे.स्वच्छता पथकातील रिक्त पदे त्वरित भरावीत.ओला, सुका व जैववैद्यकीय कचऱ्याचे त्रिस्तरीय वर्गीकरण काटेकोरपणे लागू करावे.दररोजचा स्वच्छता व तपासणी अहवाल सार्वजनिक करावा.
मुंबईतील वाढते मलेरिया व तापाचे रुग्ण मागील वर्षाच्या तुलनेत मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेले.नालेसफाई, गटारसफाई व डास नियंत्रण मोहीम वेळेत न झाल्याने गंभीर परिस्थिती.रुग्णालयांत औषधसाठा अपुरा व तपासणी पथक कमी.
सर्व वॉर्डांमध्ये तातडीने फॉगिंग, डास नियंत्रण व कचरा निर्मूलन मोहीम.नाले व गटारांची संपूर्ण स्वच्छता करून दैनिक अहवाल सार्वजनिक करावा.सर्व रुग्णालयांत मलेरियावरील औषधे, तपासणी साधने व कर्मचारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावेत.मलेरिया नियंत्रणासाठी स्वतंत्र कार्यबल (Task Force) नेमावे.
जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपायांचे मार्गदर्शन करावे.
सर्व कार्यवाही पारदर्शक ठेवून नियमित अहवाल माध्यमांत प्रसिद्ध करावेत.
ठाम इशारा वरील तिन्ही गंभीर मुद्द्यांवर तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबई महापालिकेविरोधात रुग्णांच्या व नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन उभारेल.रुग्णांच्या जीवाशी खेळ करणारी ही ढिसाळ व निष्काळजी व्यवस्था आम्ही कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…