पालघर जिल्ह्यातील उबाठा गटातील महिला आघाडीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यात प्रामुख्याने पालघरमधील महिला जिल्हाप्रमुख नीलम म्हात्रे, महिला तालुकाप्रमुख मनिष पिंपळे, माजी सभापती शैला कोलेकर, महिला शहर संघटक मनिषा पाटील, जमीला सय्यद, प्रीती मोरे, ललिता कोळी, जितेंद्र दळवी, भावेश धर्ममेहेर, मंगेश बात्रा, माजी सरपंच विकास पाटील, विवेक घरत, विनीत पाटील, कामिनी पाटील, जयेश कोरे या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
तर डहाणू तालुक्यातील माजी उपसभापती पिंटू गहला, काजल राबड, जयश्री करामोडा, सुरेंद्र राबड, पंचायत सदस्य नरहरी दायत नेहा धर्मामेहेर, कृती मंत्री, कौशिक निकोले आणि इतर सदस्यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना, शिवसेनेने गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाच्या माध्यमातून आज शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत. आज अनेक लाडक्या बहिणी आणि भाऊ पक्षात प्रवेश करत असल्याचा विशेष आनंद मला वाटत आहे. पालघर जिल्ह्याने कायमच शिवसेनेला साथ दिली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील पालघर नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच आज पालघरहून इथे यायला तुमच्यातील अनेकांना मोठी अडचण आली असली तरीही मुंबईतील कोस्टल रोड आपण मीरा भाईंदर, वसई विरार आणि त्यानंतर पालघरपर्यंत वाढवणार आहोत त्यामुळे भविष्यात तुम्हाला ट्रफिकमध्ये तासनतास अडकून पडावे लागणार नाही असे सांगितले. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे काम आणि विचार तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी पूर्ण जोमाने कामाला लागावे अशा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार आणि पालघरचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, राजेश शहा, माजी जिल्हा परिषद सभापती वैदेही वाढाण, उप जिल्हाप्रमुख सुशील चुरी, प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…