महाराष्ट्र

शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का, त्या बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आणखी एका नेत्यानं शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान या पक्षप्रवेशामुळे मुंबईत वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रतिक्षा नगरचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, दरम्यान रामदास कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसैनिकांकडून कांबळे यांच्या फोटोला आणि बॅनरला काळं फासण्यात आलं आहे, यामुळे काही काळ वातावरण चांगलंच तापलं होतं, मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे, आतापर्यंत तब्बल 124 माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. कांबळे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, लोकांच्या विकासाठी कांबळे यांनी पक्षात येण्याचा निर्णय घेतला. कुठल्याही अटी शर्ती न ठेवता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ज्यांची मुंबईमध्ये सत्ता होती त्यांनी काय काम केलं? असा सवालही यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना शिंदे यांनी म्हटलं की, कांबळे यांना आपण युवा सेनेच्या कार्यकारीणीमध्ये घेत आहोत. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे. अनेक जण शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे लोक विकासाच्या मुद्द्यावर पक्ष प्रवेश करत आहेत, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. त्यापूर्वी हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी देखील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

12 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago