महाराष्ट्र

ठाकरेंचा भाजपला जोरदार धक्का; त्या २ बड्या नेत्यांनी मशाल घेतली हाती

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे गटाची ताकद वाढली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. तसेच पक्षांतर, गटबाजी आणि नाराजीनाट्य यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये उलथापालथ पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमिवर वणीमध्ये भाजपला गळती लागली असून, ठाकरे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. ठाकरे गटाच्या पाठिशी मोठा जनसमर्थन लाट उमटत असल्याचं चित्र आहे.

यवतमाळच्या वणीमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढली. भाजपमधील २ माजी जिल्हा परिषद सदस्यांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांचा पक्षप्रवेश मातोश्रीवर पार पडला असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कमळची साथ सोडत मशाल हाती घेतलं आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्यांसह विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि काँग्रेस पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका पाहता ठाकरे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. या इनकमिंगमुळे वणीतील स्थानिक राजकारणात मोठा भूकंप झाल्याचे बोलले जात असून, येत्या काळात यवतमाळ जिल्ह्यात ठाकरे गटाची राजकीय पकड अधिक घट्ट होणार असल्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

9 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

12 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

13 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

13 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

13 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

14 तास ago