मुंबई: पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनय, लघुपट कथा लेखन तसेच चित्रपट निर्मिती व चित्रपटसृष्टीतील करिअर संधी यावर आधारित अल्पकालीन अभ्यासक्रमवर्ग आयोजित करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम २ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दादासाहेब फाळके चित्रनगरीतील चित्रांगण सभागृहात होणार आहेत.
या उपक्रमामुळे चित्रपटसृष्टीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या नवोदित व होतकरू तरुणांना व्यावसायिक मार्गदर्शनाची संधी मिळणार आहे.
२ ते ४ फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत चित्रपट निर्मितीची कला आणि चित्रपटातील करिअर संधी या विषयावर अभ्यासक्रम होणार असून त्यासाठी शुल्क ३,५०० रुपये आहे.
५ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत लघुपट कथा लेखनाबाबत प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येणार असून या अभ्यासक्रमाचे शुल्क ११,००० रुपये आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांचे सत्र संचालक म्हणून डॉ. मिलिंद दामले मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच १० ते १९ फेब्रुवारी दरम्यान सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषेत अभिनय प्रशिक्षण दिले जाणार असून या अभ्यासक्रमाचे शुल्क १७,००० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असून प्रत्यक्ष व्यावसायिकांकडून प्रशिक्षण घेण्याची ही महत्त्वाची संधी आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…