महाराष्ट्र

युती, लोचे आणि अंतर्गत टोळ्यांचे राजकारण: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे वास्तव

मुंबई (शितल करदेकर): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या केवळ विरोधकांशीच नव्हे, तर आपल्याच गटांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. राज ठाकरे यांनी उल्लेख केलेल्या “पळणाऱ्या टोळ्या” या विधानापेक्षा अधिक गंभीर वास्तव समोर येत असून, विविध पक्षांत अंतर्गत गटबाजी, लोचेकरी कारभार आणि एकमेकांना पाडण्याचे राजकारण उघड होत आहे.

महाविकास आघाडी असो वा महायुती—दोन्ही आघाड्यांमध्ये अपेक्षित एकसंघपणा कुठेही दिसून आला नाही. युती म्हणजे ताकद वाढवणारी राजकीय रचना असायला हवी, मात्र प्रत्यक्षात तीच युती अडचणी, गैरसमज आणि अंतर्गत कटकारस्थानांचे कारण ठरत असल्याचे अनेक घटनांतून स्पष्ट होते.

समाधान सरवणकरांचे आरोप आणि भाजपमधील ‘टोळी’चा मुद्दा

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९४ मधील पराभवानंतर शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांनी भाजपमधीलच काही नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्हॉटसअॅप संदेशांद्वारे त्यांच्या विरोधात प्रचार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. चार-पाच आमदार आणि दोन पक्षप्रमुखांची मुले आपल्या विरोधात प्रचार करत होती, असे सांगत त्यांनी थेट पक्षातील अंतर्गत टोळीबाजीवर बोट ठेवले आहे.

हे आरोप पक्षाच्या समन्वय समितीकडे न करता थेट माध्यमांसमोर मांडले जाणे, हा प्रश्न अधिक गंभीर बनवतो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही महायुतीचा उमेदवार कसा पराभूत होईल यासाठी काही गट काम करत होते, असा दावा राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.

हुतुतू-लगोरीसारखे राजकारण

आजचे राजकारण हुतुतू किंवा लगोरीसारखे झाले आहे—जिथे विरोधी संघ नव्हे, तर आपल्याच संघातील गडी बाद करण्याचे डाव आखले जात आहेत. यामुळे निवडणूक लढत न राहता ‘गेम’ बनत चालली आहे. ग्रह-युती आणि ‘लोचा’ ही उपमा वापरली तर, राजकारणातली ही युती लाभदायक न ठरता अडचणींचे कारण बनत असल्याचे चित्र आहे.

AI चा जमाना आणि भावनिक बुद्धिमत्तेचा अभाव

एका बाजूला एआय, तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभाव वाढत असताना, दुसऱ्या बाजूला राजकारणात भावनिक आणि बौद्धिक बुद्धिमत्तेचा अभाव जाणवतो. केवळ तांत्रिक डावपेच नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची समज आवश्यक असते. हीच समज सध्या अनेक ठिकाणी कमी पडताना दिसते.

मुंबई महापौरपदासाठीची लढाई आणि दिल्लीतील बैठका

मुंबईच्या महापौरपदासाठी इतका संघर्ष का, आणि त्यासाठी दिल्लीपर्यंत बैठका का—हा प्रश्न सामान्य जनतेला पडतो आहे. “खरी शिवसेना” म्हणत पाठिंबा देणारी महाशक्ती शिंदे गटाला पूर्ण ताकदीने काम करू देत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये युती नको, असा आक्रोश वाढत आहे.

जनतेची अपेक्षा काय?

राजकारण हे जनतेचे, जनतेसाठी आणि जनतेद्वारे चालवले गेले पाहिजे. मात्र सध्याचे चित्र पाहता, राजकीय व व्यापारी स्वार्थाच्या हाणामाऱ्या अधिक दिसत आहेत. तांत्रिक साधनांपेक्षा खरी गरज आहे ती प्रामाणिक विचारांची, भावनिक संवेदनशीलतेची आणि जनहिताला प्राधान्य देणाऱ्या राजकीय बुद्धिमत्तेची.जनतेची स्पष्ट भावना आहे—लोचा कुणाचाच व्हायला नको, आणि युती जनहितासाठी असावी, अंतर्गत खेळांसाठी नव्हे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

7 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

11 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

11 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

11 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

11 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

12 तास ago