महाराष्ट्र

रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीमेचा शुंभंकर; ‘झेब्रु’ चे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते..

नागपूर: रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने परिवहन विभाग, महाराष्ट्र शासन व राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचा शुभंकर ‘ झेब्रु ‘ चे अनावरण आज, मंगळवार दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता नागपूर येथील विधानभवनातील कॅबिनेट हॉल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे व मा. ना. श्री. अजित पवार, तसेच विधानपरिषदेचे सभापती मा. श्री. राम शिंदे व विधानसभेचे अध्यक्ष मा. अ‍ॅड. राहुल नार्वेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यासह महसूल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्री. शिवेंद्रसिंह भोसलें, परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रताप सरनाईक, सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर व नगरविकास, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री मा. ना. श्रीमती माधुरी मिसाळ यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात रस्ता सुरक्षा जनजागृती, नागरिकांचा सहभाग आणि शिस्तबद्ध वाहतूक संस्कृती निर्माण करण्यासाठी व्यापक प्रचार-प्रसार केला जाणार आहे. “सडक सुरक्षा – जीवन रक्षा!” हा संदेश यामाध्यमातून समाजात रुजवण्याचा शासनाचा मानस आहे. राज्यातील नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

6 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

6 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

6 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

7 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

7 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

20 तास ago