महाराष्ट्र

माझ्याशी हिंदीत नाही तर मराठीतच बोला; आयएएस अधिकाऱ्यांना सरनाईकांनी ठणकावले

मुंबई: माझ्याशी बोलताना हिंदीत नाही तर मराठीतच बोला, असे भर कार्यक्रमातच परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आयएएस अधिकाऱ्यांना बजावले. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मैनिक घोष हे हिंदी भाषिक आहेत.

त्यामुळे या दोघांना यापुढे हिंदीत बोलणार असाल तर मी बोलणार नाही. महाराष्ट्र केडर घेऊन जर नोकरी करीत असाल तर राज्यात मराठीत बोलायचे, असे प्रताप सरनाईक यांनी स्पस्ट केले.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांच्या उपस्थित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री सरनाईक यांनी एका कार्यक्रमप्रसंगी बोलताना आयएएस अधिकाऱ्यांनी मराठीतच बोलले पाहिजे, असा आग्रह धरला आहे.

आताच मी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मैनिक घोष यांना सांगितले आहे की, माझ्याशी बोलताना हिंदीत नाही तर मराठीतच बोला. मुंबईला मराठी, हिंदी काय वाद व्हायचा आहे तो होऊ द्या. परंतु आपल्या आयएएस अधिकाऱ्यांनी जर महाराष्ट्र केडर घेतले असेल तर मराठीतच बोलायला हवे. त्यामुळे आपला फायदा होणार नाही, तर त्यांचा फायदा होणार असल्याचे देखील सरनाईक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, याच वेळी त्यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील काही आरोपीना अटक करण्यात आली नसल्याने पालकमंत्री सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या असून त्यासाठी त्यांनी आता पोलीस यंत्रणेला 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.

दरम्यान, कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास प्रशासनाकडून दिरंगाई केली जात असून जात वैधता प्रमाणपत्र देण्यास विभागातील अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या मराठी आंदोलकांनी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेराव घातला. आमची अडवणूक केली जात असून तातडीने कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

3 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

3 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

6 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

7 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

7 तास ago