अध्यात्म आणि विकास यांचे नाते अतूट; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते आज अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. हा विशेष सोहळा शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना आणि श्रीमंत माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या प्रेरणेने महिलांच्या सामाजिक आणि अध्यात्मिक सन्मानासाठी या उपक्रमाला बळ मिळाले आहे. अध्यात्म आणि विकास यांचे नाते अतिशय जवळचे असून महिलांनी अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.”

आळंदीच्या धाडसी महिलांचा उल्लेख करत भावनिक आठवण

लाडक्या बहिणींच्या योजनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “मला आठवतंय, निधी वितरणाच्या वेळी मी आळंदीला आले होते. तिथल्या महिलांचे धाडस, आत्मसन्मान आणि कष्ट पाहून मला नेहमीच अभिमान वाटतो.”

अक्षय महाराज भोसले यांनी या महिलांचा सन्मान करण्याची कल्पना मांडली आणि ती लगेच मनापासून स्वीकारली गेली, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या भाषणात त्यांनी संत जनाबाईंचे उदाहरण देत सांगितले की, “समाजात टीका झेलूनही त्यांनी आपले अध्यात्मिक कार्य थांबवले नाही.” ही परंपरा आजच्या महिलांनीही पुढे नेली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.

डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी माहिती दिली की, “३ मे ते १० मे या कालावधीत धर्मवीर सेनेच्या वतीने, महानगरपालिका व स्थानिक संस्थांच्या सहकार्याने भव्य अध्यात्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

सन्मान सोहळ्याचे प्रभावी संयोजन

यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार अनिताताई सुद्रिक, जेष्ठ कीर्तनकार गयाबाई यादव, मृदंगाचार्य देविदास महाराज मांडगे, विठ्ठल महाराज कापसे व वारकरी संप्रदायातील मोठे योगदान असणाऱ्या सर्व महिलांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, श्रीमंत माऊली प्रतिष्ठानच्या प्रमुख विनित माऊली सबनीस आणि सहअध्यक्ष प्रभंजन दादा महातोले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तर, अखिल वारकरी गुरुकुल संघाचे अध्यक्ष बाळासाहेब महाराज शेळके, माऊली महाराज सुरडकर, ज्ञानेश्वर माऊली जाधव, कैलास महाराज गायकवाड, अनंत महाराज धर्मे, किशोर महाराज धुमाळ, अंकुश महाराज कदम व सर्व आळंदीतील गुरुकुलाचे अध्यक्ष महाराज मंडळी यांचा प्रमुख सहभाग होता.

त्याचबरोबर शिवसेना प्रवक्त्या, उपनेत्या संजना घाडी, उपनेत्या सुलभा उबाळे, संर्पक प्रमुख सारिका पवार, जिल्हा प्रमुख मनिषा परांडे, तालुका प्रमुख प्रिया पगडे, आळंदी नगराध्यक्ष सौ.घुंडरे, रामशेठ गावडे, नितीन गोरे, प्रकाश वाडेकर, आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

4 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

14 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

14 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

14 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

14 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

14 तास ago