शिरूर तालुका

शिरूरचे माजी आमदार काकासाहेब पलांडे यांचे नातू शर्विन पलांडे यांच्या दशक्रियेला लोटला जनसागर…

मुखई, २१ एप्रिल २०२५ (संतोष धायबर) : शिरूर तालुक्याचे सर्वाधिक लोकप्रिय माजी आमदार सूर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांचे नातू आणि कोकण भवन येथील उपायुक्त संजीव पलांडे यांचे सुपूत्र शर्विन ऊर्फ चिकू (वय २१) यांच्या दशक्रिये निमित्त शनिवारी (ता. १९) शिरूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून जनसागर लोटला होता. शर्विन यांचे ऐन तारुण्यात निधन झाल्यामुळे उपस्थितांपैकी प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता.

शर्विन पलांडे यांचे १३ एप्रिल रोजी मुंबई येथे निधन झाले. मुखई (ता. शिरूर) येथे त्यांच्या मूळ गावी सोमवारी १४ एप्रिल रोजी अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुखई गावामध्ये शनिवारी (ता. १९) दशक्रिया विधी पार पडला. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. शिरूर तालुक्याचे खऱ्या अर्थाने सर्वाधिक लोकप्रिय माजी आमदार काकासाहेब पलांडे यांच्यावर भरभरून प्रेम करणारे नागरीक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहून सांत्वन करत होते.

शर्विन संजीव पलांडे यांचे बालपण आणि शिक्षण मुंबई येथे झाले. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुषार होते. सध्या ते वकिलीचे शिक्षण घेत होते. मुंबई येथे रविवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, एक बहिण, आजी, आजोबा, आत्या, मामा असा परिवार आहे. शर्विन यांचे ऐन तारुण्यात निधन झाल्यामुळे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुखई येथील त्यांच्या मूळ गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधी पार पडला. यावेळी अक्षरशः जनसागर लोटला होता. हभप रसाळ महाराज यांचे प्रवचन यावेळी झाले.

दशक्रिया विधीच्या वेळी श्रध्दांजली अर्पण करताना माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव आमदार रोहित पाटील म्हणाले, ‘दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे माजी आमदार काकासाहेब पलांडे यांच्याशी स्नेहाचे संबंध होते. कायदाचे शिक्षण घेत असलेल्या शर्विन यांना कायदासह विविध विषयात गती होती. त्यांच्या निधनाने आपण एक उमदा युवक सहकारी मित्र गमावला आहे. अशा दुःखद प्रसंगी उपस्थित राहावे लागेल, असे वाटले नव्हते.’

गणेगावचे सुपुत्र आणि आयपीएस अधिकारी अमोल तांबे म्हणाले, ‘शिरूर तालुक्याचे माजी आमदार काकासाहेब पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अधिकारी घडले आहेत. शिरूर तालुक्यातील ५००हून अधिकारी देशभरात मोठ्या हुद्यांवर काम करत आहेत. शर्विन यांच्या जाण्यामुळे पलांडे कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. दुःख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करत शिरूर तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.’

मान्यवरांची उपस्थिती…
आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार रोहित पवार, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार ॲड अशोक पवार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, आयपीएस अमोल तांबे, आयपीएस दीपक साकोरे, यशदाचे ॲडिशनल डायरेक्टर शेखर गायकवाड, सनदी आधिकारी कांतीलाल उमाप, माजी कुलगुरु डॉ. पंडितराव पलांडे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंधर कामठे, जिल्हा बॅकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, अशोक पलांडे, डीवायएसपी अनिल कटके, विकास पानसरे, मंत्रालय सहसचिव अजित देशमुख, डॉ. एकनाथ खेडकर, संदिप निचित, संदिप कोहकडे, पंडित खेडकर आयुक्त GST, अनिल कटके DYSP, चांगदेव पिंगळे (निवृत्त विशेष लेखा परीक्षक), वसंतराव गुंड सनदी लेखापाल, योगेश म्हसे, अविनाश ढाकणे, अशोक मोराळे, विजय सूर्यवंशी, राजेंद्र क्षिरसागर, भाऊसाहेब दागंडे, गजानन पाटील, गणेश पाटील, सुषमा सातपुते, अनिल महाजन, पवन चांडक, संदिप माने, सिद्धेश्वर मोकाशी, गोपीचंद कदम, कान्हुराज बगाटे, सुरज मांढरे, श्री. नेवतकर, राजेश नार्वेकर, मुंबई येथील कोकण भवनमधील अधिकारी, कर्मचारी, शिरूर तालुक्यातील विविध गावांमधील आजी-माजी सरपंच, सासायटींचे अध्यक्ष, नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सांत्वनपर भेट…
शर्विन संजीव पलांडे यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर महाराष्ट्रातील आजी-माजी आमदारांनी मुखई येथील पलांडे यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. यामध्ये आमदार दिलीप वळसे पाटील, राम कांडगे, जगन्नाथ शेवाळे, खासदार निलेश लंके, माजी खासदार नानासाहेब नवले, माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार संभाजी कुंजीर, माजी आमदार दिलीप ढमढेरे, माजी सभापती शंकरराव गाढवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घरी जाऊन पलांडे कुटुंबियांचे सांत्वन केले.

आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रू…
मुखई गावामधून जात असलेल्या नदीच्या तीरावर दशक्रिया विधी पार पडला. प्रत्येकजण जड अंतकरणरणाने उपस्थिती नोंदवत होता. दशक्रिया विधी पार पडल्यानंतर शर्विन यांचे वडिल संजीव आणि मातोश्री अस्मिता यांची भेट घेण्यासाठी अनेकजण पुढे सरकत होते. आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारा पाहूनच उपस्थितांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. सदैव हसतमुख असणाऱ्या संजीव यांचा डोळ्यातील अश्रू पाहून प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता.

पहाडासारखे उभे राहिलेले आजोबा…
पलांडे कुटुंबियांमधील लाडका शर्विन ऊर्फ चिकू यांचे ऐन तारुण्यात निधन झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काकासाहेब या आजोबांचा लाडका चिकू पुढील प्रवासाला निघून गेल्याचे मोठे दुःख असतानाही आजोबा पहाडासारखे उभे राहून कुटुंबियांना धीर देत होते. उपस्थितांना सामोरे जात होते. पण, पहाडासारखे उपस्थित असलेल्या आजोबांच्या मनातील हळवेपणा जाणवत होता. नातू आपल्यातून निघून गेल्याचे दुःख दिसत होते. शिरूर तालुक्यातील लाडक्या काकांनी अनेकांच्या दुःखद प्रसंगावेळी भेट देऊन सांत्वन केले. परंतु, काकांचे सांत्वन करण्याचे वेळ येईल, असे कधी वाटले नव्हते, अशी उपस्थितांमध्ये चर्चा होती.

हळहळणारे नागरिक…
शर्विन यांचा दशक्रिया विधी पार पडत असताना मोठे गंभीर वातावरण होते. हभप रसाळ महाराज प्रवचन सांगत असताना प्रत्येकजण हळहळत होता. खरंच, अनेकांच्या मुखामधून शब्द फुटत नव्हते. महिलांच्या डोळ्यांमधून येणारे अश्रू खूप काही सांगून जात होते. ऐन तारुण्यात एखाद्या उमद्या मुलाच्या जाण्याने कुटुंबियांवर केवढा मोठा आघात होतो, हे स्पष्ट दिसत होते.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील पलांडे कुटुंब हे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली मानले जाते. सूर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे हे शिरूर तालुक्याचे माजी आमदार असून, त्यांनी या भागात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. शिरूर तालुक्याचे सर्वाधिक लोकप्रिय माजी आमदार म्हणून त्यांची आज ओळख आहे. त्यांचे सुपुत्र संजीव पलांडे सध्या कोकण भवन येथे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

माजी आमदार काकासाहेब पलांडे यांचे नातू शर्विन पलांडे यांचे निधन…

ध्येयवादी काका: सूर्यकांत गुलाबराव पलांडे…

आई वडिलांच्या वाढदिवसानिमित्त पलांडे कुटुंबियांचा अनोख उपक्रम

निमगाव म्हाळुंगी येथील माजी उपसरपंच रंजना काळे यांचे निधन

सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्रीधर तांबे यांचे निधन

रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…

38 मिनिटे ago

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

14 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

20 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

20 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

20 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

20 तास ago