महाराष्ट्र

प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदेंचा जलवा

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांचे मायभूमी सातारा जिल्ह्यात शनिवारी धमाकेदार स्वागत करण्यात आले. शिरवळपासून कराडपर्यंत आ. शशिकांत शिंदे यांचा जलवा पाहायला मिळाला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली. यावेळी सातार्‍यासह ठिकठिकाणी जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाकाय क्रेनच्या सहाय्याने आ. शशिकांत शिंदे यांना पुष्पहार घालण्यात आला. दरम्यान, तमाम कार्यकर्त्यांच्या मांदियाळीत आ. शशिकांत शिंदे हरवून गेल्याचे पहायला मिळाले.

प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी शिरवळपासून कराडपर्यंत महामार्गा-वरील प्रमुख गावांच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शिरवळ येथे स्वागत झाल्यानंतर खंडाळा, कवठे, भुईंज, पाचवड, आनेवाडी टोलनाका येथे कार्यकर्त्यांकडून होणारे स्वागत स्वीकारत आ. शिंदे यांच्या वाहनांचा जथ्था वाढे फाटामार्गे सातार्‍यात पोहोचला.

सातार्‍यातील राष्ट्रवादी भवन परिसरात आ. शिंदे यांच्या स्वागतासाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. राष्ट्रवादी भवनासमोर स्वागत कमान उभारण्यात आली होती. तर जागोजागी त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. रस्त्याच्या मध्यभागी पक्षाचे झेंडेही लावले होते. महिला पदाधिकार्‍यांनी फेटे बांधले होते. या महिलांनी आनंदाने कार्यालयासमोर फुगड्या घातल्या. आ. शशिकांत शिंदे येताच फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पहार, बुके देऊन उत्साहात स्वागत केले. ‘शिंदेसाहेब तुम आगे बढो… हम तुम्हारे साथ है, पवारसाहेबांचा निष्ठावान मावळा शिंदेसाहेब… शिंदेसाहेब’, अशा जोरदार घोषणा महिला व कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी महिला पदाधिकार्‍यांनी आ. शशिकांत शिंदे यांचे औक्षण केले.

राष्ट्रवादी भवनापासून रॅलीला पुन्हा सुरुवात झाली. ही रॅली पोवईनाक्यावर येऊन थांबली. कार्यकर्त्यांनी आ. शिंदे यांना खांद्यावर उचलून घेतले. या ठिकाणी दोन जेसीबीवर अडकवलेले भले मोठे हार आ. शिंदे यांना घालण्यात आले. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय..’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिवतीर्थाच्या सभोवती हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेली जनता हा सोहळा न्याहाळत होती. त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि किसनवीर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यानंतर ही रॅली बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये गेली. येथेही जेसीबीतून पुष्पहार घालण्यात आला. यानंतर रॅली अजंठा चौकाकडे गेली. तिथे तर सकाळपासूनच कार्यकर्त्यांचा उत्साह होता. ठिकठिकाणी स्वागत स्वीकारत पुढे जात असल्याने आ. शिंदे यांच्या रॅलीच्या नियोजनाची वेळ पुढे-पुढे जात होती. अजंठा चौकात दुपारी चार वाजता रॅली पोहोचली. येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. रॅलीमध्ये प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ नलवडे, बंडू ढमाळ, अर्चना देशमुख, संगिता साळुंखे, डॉ. नितीन सावंत, सुभाष कारंडे, दिलीप बाबर, तेजस शिंदे, साहिल शिंदे या पदाधिकार्‍यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

‘राष्ट्रवादी पुन्हा’चा एकच गजर…

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या रॅलीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वातावरण निर्माण केले. प्रदेशाध्यक्षपदावर आ. शशिकांत शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये हत्तीचे बळ आल्याचे पहायला मिळाले. ‘आवाज कोणाचा… आवाज जनतेचा.. दाही दिशांतून घुमला राष्ट्रवादी पुन्हा’ या गाण्याने तर कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.

कार्यकर्त्यांच्या उत्साहाने आ. शिंदे भावूक…

केंद्रात व राज्यात सत्ता नसतानाही हजारोंच्या संख्येने स्वागतासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना पाहून आ. शशिकांत शिंदे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. गर्दीतून जाताना धक्काबुक्की होत होती. कार्यकर्ते खांद्यावर घेऊन नेत होते, तरीही कार्यकर्त्यांचा कुठलाच आग्रह आ. शिंदे यांनी मोडला नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

16 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago