महाराष्ट्र

धक्कादायक..! प्रॉपर्टीसाठी बहिणीला ठेवले मेंटल हॉस्पिटलमध्ये,आईला वृद्धाश्रम

पुणे: वडिलोपार्जित मालमत्तेसाठी भावाने आपल्या मोठ्या बहिणीला इंजेक्शन देऊन ब्लड टेस्टच्या नावाखाली घेऊन जात मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकले, तर वयोवृद्ध आईला जबरदस्तीने वृद्धाश्रमात जमा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी भावाला अटक केली आहे.

धर्मेंद्र इंदूर राय (५४, रा. चेंबूर, मुंबई) असे अटक केलेल्या भावाचे नाव आहे. त्याच्याबरोबर ४ अनोळखी महिला बाउन्सरवर देखील विविध कलमांसह मेंटल हेल्थ केअर अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ५६ वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सिंध हाउसिंग सोसायटीत ७ जुलै रोजी दुपारी ३ ते १८ जुलैदरम्यान दुपारी चारच्या सुमारास दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची वयोवृद्ध आई या सिंध हाउसिंग सोसायटीत त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहत होते. ही मालमत्ता ताब्यात घेण्याच्या उद्देशाने फिर्यादी त्यांचा लहान भाऊ आरोपी धर्मेंद्र राय हा चार महिला बाउन्सर घेऊन आला. त्यांची मानसिक स्थिती चांगली असतानाही त्यांच्या डाव्या हातामध्ये इंजेक्शन दिले. त्यांना ब्लड टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे, असे खोटे सांगून महिला बाउन्सरच्या मदतीने जबरदस्तीने मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांचा मानसिक छळ केला. तसेच त्यांच्या वयोवृद्ध आईला तिची परवानगी न घेता, जबरदस्तीने वृद्धाश्रमात दाखल केले. त्यांच्या राहत्या घराचा ताबा फिर्यादीकडे असतानादेखील फिर्यादीची फसवणूक करून जबरदस्तीने फिर्यादींना घराबाहेर काढून घराचा ताबा घेतला.

फिर्यादी यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकल्याचे समजल्यावर त्यांच्या शेजारी व इतर मित्रमैत्रिणींनी त्यांची तेथून सुटका केली. त्यांना त्यांच्या घरी आणल्यावर धर्मेंद्र राय याने त्यांना घरात येण्यास अटकाव केला. तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले. चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज हांडे व त्यांच्या सहकार्यांना तत्काळ घटनास्थळी जात आरोपी धर्मेंद्र राय याला अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक करांडे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

8 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago