महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना पॉलीटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ४ जुलैपर्यत अर्ज सादर करण्याची पुन्हा संधी

मुंबई: प्रथम वर्ष पदविका (पॉलीटेक्निक) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकरिता केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांना २ जुलै ते ४ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.या प्रवेश प्रक्रियेसाठी पूर्वी ३० जून २०२५ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. या कालावधीत एकूण १ लाख ५८

हजार ८७६ उमेदवारांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १लाख ३८ हजार २९८ विद्यार्थ्यांनी अर्जाची अंतिम प्रक्रिया पूर्ण करून शुल्क भरले आहे. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिळालेल्या प्रतिसादामुळे आणि अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीवरून प्रवेशासाठी आणखी एक अंतिम संधी देण्यात येत आहे. या अंतिम टप्प्यात अर्ज सादर करून ४ जुलै २०२५ पर्यंत अर्ज निश्चित करणाऱ्या उमेदवारांचा अंतिम गुणवत्ता यादीमध्ये समावेश केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करताना आवश्यक त्या कागदपत्रांची माहिती, सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेश प्रक्रियेचा तपशील पाहण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवून मोदींना हटवण्याचे स्वप्न पाहू नका! विरोधकांना एकनाथ शिंदेंचा ठाण्यातून घणाघात

‘लोकतंत्र बचाव’च्या नावाखाली काँग्रेसकडून लोकशाहीबाबत संभ्रम; व्होट चोरीच्या आरोपांवर पुरावे देण्याचे शिंदेंचे आव्हान ठाणे :…

7 तास ago

दुष्काळात बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही; आज मदतीचा हात, उद्या शेताला पाणी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेडच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही; १०० बेडचे रुग्णालय २०० बेडचे करण्याचे निर्देश, शेतकऱ्यांना…

7 तास ago

संघर्षातून सत्तेच्या शिखरापर्यंत! जनतेच्या विश्वासातून घडलेले नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे

रिक्षाचालक ते उपमुख्यमंत्री; संघर्ष, संघटनकौशल्य, लोकसंपर्क आणि विकासाभिमुख वाटचालीचा प्रेरणादायी प्रवास मुंबई: नेतृत्व हे केवळ…

7 तास ago

डिंग्रजवाडीतून ५ लाखांचे सर्व्हे मशिन चोरीला; शिक्रापूर पोलिसांची हरियाणापर्यंत धडक!

एक आरोपी हरियाणातून, तर दुसरा विश्रांतवाडीतून जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर…

10 तास ago

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

1 दिवस ago

कडूलिंबातील औषधी गुण

कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…

1 दिवस ago