मुंबई : सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या सुनावणीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या मालकीच्या वादावर मोठे विधान केले आहे.
‘शिवसेना ठाकरेंची होती, आहे आणि उद्याही राहील’
शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. शिवसेना यापूर्वीही ठाकरेंचीच होती, आजही आहे आणि उद्याही राहील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि ते हयात असताना त्यांनी पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्या हातात दिली. त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे, असे त्या म्हणाल्या.
एखाद्याचे मत वेगळे असेल, तर त्यांनी राज ठाकरे यांच्याप्रमाणे वेगळी चूल मांडायला हवी होती. त्यांना कोणी अडवले होते? स्वतःच्या कर्तृत्वावर पक्ष उभा करणे ही कौतुकाची गोष्ट आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगावरही निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भातील वादावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरही टीका केली. शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढून घेण्यात आला आणि निवडणूक आयोगाने आपल्या सोयीप्रमाणे तो पक्ष दुसऱ्यांना बहाल केला, असा आरोप त्यांनी केला.
शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे फाउंडर मेंबर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानामध्ये आमदार आणि खासदारांचे मतदान निर्णायक नसून पक्ष ज्याचा आहे, त्याच्याकडे पक्ष राहील, अशी तरतूद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार यांचाच पक्ष आहे, तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. यासंदर्भातील सर्व पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने अतिशय चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय केला, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
FCRA कायद्यावरही टीका
यावेळी सुप्रिया सुळे यांनी FCRA कायद्यावरही भाष्य केले. शिक्षणसंस्था आणि सामाजिक संस्थांना परदेशातून निधी मिळतो. सामाजिक संस्थांच्या मदतीने पोलिओसारख्या आजाराविरोधात मोठे काम झाले. अशा सामाजिक उपक्रमांसाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. मात्र, सामाजिक संस्था काहीतरी देशद्रोही काम करत आहेत, अशा पद्धतीने FCRAकडे पाहिले जाते, ही भूमिका आम्हाला मान्य नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…
बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…
मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…
अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…
तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि वेगवेगळे आजार टाळण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. पौष्टिक आहार घेतात आणि…
कोलेस्टेरॉल (Cholesterol) हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्ही आहे. यामुळेच…