महाराष्ट्र

दिलीप लांडे यांच्यावर आचार संहिता भंग केल्याप्रकरणी कार्यवाही करा

मुंबई: काल रात्री पवई येथील हॉटेल मिनी पंजाब मधील हाल मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे यांच्या रिद्धी सिद्धी संस्थेच्या तसेच शिंदे गटाच्या उपनेत्या मीनाताई कांबळे व संध्या वढावकर यांनी प्रेशर कुकर, साडी, हॉट-पॉट व इतर गृह उपयोगी सामान वाटप करीत दिलीप लांडे यांनाच मतदान करा असे आवाहन करीत असल्याची तक्रार प्राप्त होताच १६८ चांदिवली निवडणूक कार्यालयातील दक्षता विभाग व पवई पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा करीत तेथील DVR व इतर सामुग्रीसह मुद्दे माल जप्त केला असून पुढील कार्यवाही सुरु केली आहे.

दिलीप लांडे यांच्यावर यापूर्वीही शासकीय पैशातून प्रेशर कुकर घोटाळा केल्याचा अहवाल मनपाच्या दक्षता विभागाने सादर केलेला आहे. ऐन निवडणुकी काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुह उपयोगी सामान वाटप करीत दिलीप लांडे यांनी सरळ-सरळ आचार संहितेचा भंग केला असून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक लोकांनी केली आहे.

श्रीमती कल्पना गोडे

निवडणूक निर्णय अधिकारी, 

१६८ चांदिवली मतदार संघ 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

3 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

10 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago