महाराष्ट्र

ठाकरेंचा दरारा! शिंदेंची ‘ती’ कृती लक्षवेधी ठरली

मुंबई: गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांवर टिकेचे बाण सोडणारे, एकमेकांना पाण्यात पाहणारे दोन दिग्गज नेते आज शेजारी शेजारी, एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले. शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच फोटो फ्रेममध्ये दिसून आले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ काल संपन्न झाला. या समारंभानंतर विधिमंडळाच्या बाहेर फोटोसेशन पार पडलं. त्यावेळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या अगदी शेजारी पाहायला मिळाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्या शेजारी बसणं टाळलं. पण शिंदे यांची एक कृती सर्वाधिक लक्षवेधी ठरली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सदनातील कार्यकाळ काल संपला. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. या सोहळ्यानंतर फोटोसेशन पार पडलं. या फोटोसेशनसाठी मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अंबादास दानवे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अशी सगळी दिग्गज मंडळी रांगेत मांडण्यात आलेल्या खुर्च्यांवर बसलेली होती.

अंबादास दानवे शिवसेना उबाठाचे नेते आहेत. त्यांच्या निरोप समारंभावेळी आयोजित फोटोसेशनला उद्धव ठाकरे दिसत नसल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. सगळे दिग्गज स्थानापन्न झालेले असताना उद्धव ठाकरे सभागृहातून बाहेर आले. त्यांना पाहून कोपऱ्यातील खुर्चीवर बसलेले चंद्रकांत पाटील लगेच उठले. लगोलग दानवे उठून उभे राहिले. यावेळी अजित पवार, राहुल नार्वेकर, देवेंद्र फडणवीस बसलेलेच होते. ठाकरे आल्याची कल्पना त्यांना आलेली नव्हती. या नेत्यांनी ठाकरेंना पाहिलेलंच नव्हतं.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे येताच उपमुख्यमंत्री आणि ठाकरे यांचे एककाळचे सहकारी आणि आताचे कट्टर वैरी एकनाथ शिंदे तातडीनं उभे राहिले. त्यांची ही कृती लक्षवेधी ठरली. ठाकरेंसाठी खुर्ची उपलब्ध होईपर्यंत शिंदे उभेच होते. पुढच्या काही क्षणांत ठाकरेंना पाहताच फडणवीस, अजित पवार, नार्वेकर उभे राहिले. त्यांनी ठाकरेंना नमस्कार केला. बसायला जागाच शिल्लक नसल्यानं ठाकरे त्यांच्यासमोर पुढे गेले. शिंदे यांच्याकडे पाहणं टाळून पुढे गेलेले ठाकरे नीलम गोऱ्हेंशी आवर्जून बोलले.

नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंसाठी खुर्ची मोकळी करुन दिली. तिथे ठाकरेंना बसण्याचा आग्रह केला. पण ती खुर्ची शिंदे यांच्या शेजारी असल्यानं उद्धव यांना बसण्यास नकार दिला. गोऱ्हे यांनी दोन, चारवेळा आग्रह केला. पण ठाकरे बसले नाहीत. अखेर ठाकरे गोऱ्हे यांच्या उजव्या बाजूला बसले. त्यावेळी गोऱ्हेंच्या डाव्या बाजूला शिंदे स्थानापन्न झाले होते. पण शिंदे, ठाकरे स्थानापन्न होण्याआधी ते काही सेकंद एकमेकांच्या अगदी शेजारी उभे होते. पण त्यांनी एकमेकांकडे पाठ केलेली होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

11 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago