महाराष्ट्र

धाकट्या भावाच्या युतीवर प्रकाश आंबेडकर प्रचंड संतापले

मुंबई: शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांची युती झाल्याचे जाहीर केले. पण त्यानंतर चार तासांतच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आनंदराज आंबेडकर यांच्यावर सडकून टीका करत हल्लाबोल चढवला आहे. ही युती म्हणजे आंबेडकरविरोधी असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

वंचित बहुजन आघाडीने याबाबतचे एक निवेदन प्रसिध्द केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, रिपब्लिकन सेनेची भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत युती म्हणजे म्हणजे केवळ भाजपविरोधात आणि संविधान वाचविण्यासाठी लढणाऱ्या चळवळीविरोधातच नव्हे तर फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारधारेविरोधातही आहे.

वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकरावर हल्ला चढविताना त्यांचा पपेट असा उल्लेख केला आहे. आम्ही आधी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला निवडणुकांमधील मदत केली होती. त्यांच्या विनंतीवरून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना वंचितच्या एबी फॉर्ममध्ये सामावून घेतले होत. अमरावती लोकसभेत आनंदराज यांना पाठिंबा दिला होता. पण आता हे सौजन्य समाप्त झाले आहे. वंचित काही मुद्द्यांवर मतांमधील भेद स्वीकारू शकते, पण बाबासाहेबविरोधी आणि आरएसएस-भाजपचे पपेट म्हणून काम करणाऱ्यांना नाही, अशी टीका कऱण्यात आली आहे.

वंचितने शाहू-फुले-आंबेडकरी विचारांच्या लोकांना आवाहनही केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आता आरएसएस-भाजपचे पपेट असलेले, संविधानाऐवजी मनुस्मृतीला मानणाऱ्यांसोबत उभे राहायचे की संविधान वाचविण्यासाठी लढणाऱ्या विचारधारेसोबत याचा निर्णय आता शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारेतील लोकांनी घ्यायचा असल्याचे वंचितने म्हटले आहे. एकप्रकारे वंचितने आंबेडकरी जनतेला आंबेडकर-शिंदे युतीसोबत न जाण्याचेच आवाहन केले आहे.

आनंदराज आंबेडकर यांच्या निर्णयामुळे आम्ही खूप निराश झाल्याचेही वंचितच्या निवेदनात म्हटले आहे. या केवळ आमच्या भावना नाहीत, असे आम्ही मानतो. याद्वारे आम्ही रिपब्लिकन सेनेतील नाराज सदस्यांना वंचित बहुजन आघाडीत येण्यासाठी आमंत्रित करत असल्याचे निवदेनात स्पष्ट करण्यात आले आहे.

निवेदनाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी एकप्रकारे आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांचे टेन्शन वाढविले आहे. रिपब्लिकन सेनेला भगदाड पाडण्याचेच त्यांचे प्रयत्न दिसत आहेत. त्यामुळे आनंदराज आंबेडकर यांच्या माध्यमातून आंबेडकरी मते आपल्यासोबत आणण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या मनुसब्यांनाही धक्का बसला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव एमआयडीसीत बेकायदा पिस्तूल बाळगणारा जेरबंद; ३५ हजारांचा गावठी कट्टा जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) परिसरात बेकायदेशीररीत्या विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका व्यक्तीला…

1 तास ago

सहा महिन्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र’; जिल्हाध्यक्ष संजय पवारांचा मोठा दावा, ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार निवडणुका?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.…

1 तास ago

‘मित्रपक्षाची साथ मिळाली नाही’; पुण्यातील पराभवावर सचिन अहिरांची खंत, संघटना बळकट करण्याचा निर्धार

पुणे: विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुण्यात शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त…

2 तास ago

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव…

2 तास ago

स्टार प्रवाहवर मोठा बदल! ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’च्या आगमनासोबत ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेचा निरोप

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल सुरू असून प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांची मेजवानी…

3 तास ago

‘गुंगी गुडिया’वरून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर पलटवार; महिलांचा अवमान थांबवा, उमेश पाटील यांची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावरील काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून…

4 तास ago