मुंबई: आमचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाला धन्यवाद देत न्यायदेवतेवरील आमचा विश्वास आणखी दृढ झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे यांनी दिली आहे.
नवाब मलिक यांचा पक्षाच्या ध्येय धोरणांमध्ये आणि पक्षाच्या वाटचालीत सिंहाचा वाटा राहिला आहे. २००९ – १० पासून नवाब मलिक यांचा आणि माझा जवळचा संबंध आला. त्यावेळी नवाब मलिक हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून काम पहात होते. पक्षासाठी त्यांनी जो लढा दिला आहे तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. नवाब मलिक ज्या अडचणीतून गेले त्यावर मात करून ते लवकरच कार्यरत होतील, अशी खात्री संजय तटकरे यांनी व्यक्त केली आहे. आम्ही नवाब मलिक यांची आतुरतेने वाट बघत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिडिया सेलला त्यांच्या येण्याने नक्की उभारी मिळेल असा विश्वासही संजय तटकरे यांनी व्यक्त केला.
मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…
पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…
शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…
बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…
अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…