महाराष्ट्र

भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे परिसराचा सर्वांगीण विकास होणार; सुनेत्रा पवार

मुंबई: श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या जागेची पाहणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शनिवारी केली.

यावेळी त्यांनी भाविकांसाठी प्रस्तावित विविध सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. भीमाशंकरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वाचा विचार करून विकास आणि संवर्धन यांचा समतोल राखत प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन होण्यास मदत होईल. तसेच ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा, भाविकांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणे आणि पर्यटन विकासाला चालना मिळून संपूर्ण परिसराचे सकारात्मक परिवर्तन घडेल.

यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे दर्शन घेऊन आरती केली. तसेच संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी प्रार्थना त्यांनी केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार अतुल बेनके तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

5 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago