महाराष्ट्र

राज्यात आज उत्साहात ‘शाळा प्रवेशोत्सव’; प्रत्येक बालकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार

मुंबई: राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्सवात रूपांतर करणे या उद्देशाने राज्यभर आज ‘शाळा प्रवेशोत्सव 2026’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विदर्भ विभागातील शाळा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असल्याने विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विविध शाळांना भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.

‘पहिले पाऊल’ या विशेष उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा घेऊन त्याची प्रत पालकांना दिली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात येणार असून शाळेचा पहिला दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जाणार आहे. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे.

शाळा प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, पालकांचा विश्वास दृढ करणे आणि शासकीय शाळांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. मागील वर्षी राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पटसंख्येतील घट कमी होऊन काही ठिकाणी वाढही नोंदविण्यात आली होती.

यंदा प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याला किमान एका शाळेला भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी एक शाळा ‘दत्तक शाळा’ म्हणून स्वीकारून तिच्या शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.

शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांना अंगणवाडी व बालवाडी केंद्रांना भेटी देऊन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यास, पालकांशी संवाद साधण्यास आणि शासकीय शाळांमधील विविध सुविधा व शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. समाजमाध्यमे, ग्रामस्तरीय जनजागृती, दवंडी आणि व्हॉट्सॲप गटांच्या माध्यमातूनही व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येत आहे.

राज्यभर या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर ‘शाळा प्रवेशोत्सव कक्ष’ स्थापन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या शाळा भेटींची माहिती, छायाचित्रे आणि अहवाल ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदविण्यात येणार आहेत.

शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज यांच्या संयुक्त सहभागातून प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात यावे आणि ‘शिक्षणसमृद्ध महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

14 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago