महाराष्ट्र

जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरची होणार लगेच दुरुस्ती! इथे नोंदवा तक्रार…

बारामती(प्रतिनिधी) ट्रान्स्फॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास तत्काळ दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महावितरण’ला तसे निर्देश दिले आहेत. स्थानिक नागरिकांनी त्यासंबंधीची तक्रार करण्यासाठी ‘महावितरण’ने १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहे, शिवाय महावितरणच्या ॲपवरूनही तक्रार नोंदवता येणार आहे.

महावितरण’ला ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर किमान तीन दिवसात ट्रान्स्फॉर्मर बदलून तथा दुरुस्त करून दिला जात आहे. तथापि, ट्रान्स्फॉर्मर जळाल्याचे उशिराने समजल्यानंतर प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास आणखी विलंब होतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर तक्रार आल्यानंतर तत्काळ दुरुस्ती करून दिली जात आहे. त्यासाठी ग्राहकांना एक रुपयाही भरावा लागत नाही हे विशेष.

ॲपवरून तक्रार अशी करा…

सर्वप्रथम मोबाईलवर ‘महावितरण’ ॲप उघडा

नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा त्या बटणावर

ग्राहकाचे नाव नंबर दिसेल त्यावर

आपले कनेक्शन ज्या ट्रान्सफॉर्मरला जोडले आहे, त्याचा नंबर, गाव, तालुका- जिल्ह्याची माहिती भरलेली दिसेल.

ट्रान्सफॉर्मर जवळील खूण कोणती, कधीपासून ट्रान्सफॉर्मर बंद आहे आणि कोणता बिघाड दिसतो याची माहिती भरा.

संबंधीत ट्रान्सफॉर्मरचा फोटो काढून अपलोड करा.

नोंद करा किंवा सबमिट हे बटण दाबा.

याप्रमाणे ट्रान्सफॉर्मरची तक्रार नोंदविली जाईल. त्याची नोंद थेट महावितरणच्या मुख्य सर्वरमध्ये होईल आणि तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल.

ट्रान्सफॉर्मर बदलला की, त्याची माहिती ग्राहकाला एसएमएसद्वारे दिली जाते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लवंग आणि लिंबाचं पाणी, आरोग्यासाठी ठरते जादूई! पाहा तिखट-आंबट चवींचा खास उपाय

लिंबू आणि लवंग या दोन्ही गोष्टींचा वापर कशात ना कशात रोज भारतीय घरांमध्ये केला जातो.…

7 तास ago

संधीवात आणि सांधेदुखीत फायदे मंद आहे पंतजलीचे हे औषध

संधीवात, ज्यास इंग्रजीत Arthritis म्हटले जाते. ज्यात सांध्यात सूज आणि तीव्र वेदना होतात. शरीरातील रोगप्रतिकारक…

7 तास ago

शरीर सांगतं फुप्फुसं कमकुवत होत असल्याची लक्षण

जसजसं आपलं वय वाढत जातं शरीरही हळूहळू कमजोर होतं. त्यामुळे वाढत्या वयात लवकर थकवा येण्याची…

7 तास ago

‘घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा; विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी…

7 तास ago

मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता; धिरज देशमुखांची सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी

मुंबई : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अपुरा व विस्कळीत पाऊस, पावसातील दीर्घ खंड, घटलेली मृदा…

7 तास ago

‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’; एकनाथ शिंदे

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; तूर, सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान अकोला: कमी पर्जन्यमान आणि पावसातील प्रदीर्घ खंडामुळे…

7 तास ago