आरोग्य

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

वेगवेगळ्या डाळींचं सेवन करण्याचा सल्ला नेहमीच डॉक्टर देत असतात. कारण या डाळी शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. डाळींमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्व असतात. ज्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. पण तुम्हाला आठवत असेल की, आजारी पडल्यावर मूग डाळ खाण्याचाच सल्ला जास्त दिला जातो. कारण मूग डाळीमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. जे खूप फायदेशीर असतात. अनेकदा मूग डाळीचं पाणी पिण्याचाही सल्ला दिला जातो. याचं कारण आज आपण जाणून घेऊया.

मूग डाळीच्या पाण्यातील पोषक तत्व

एक्सपर्ट सांगतात की, सामान्यपणे एक वाटी मूग डाळीच्या पाण्यात प्रोटीन १४ ग्रॅम, फॅट १ ग्रॅम, फायबर १५ ग्रॅम, फॉलेट ३२१ मायक्रोग्रॅम, शुगर ४ ग्रॅम, कॅल्शिअम ५५ मिली, मॅग्नेशिअम ९७ मिली, झिंक ७ मिली असतं. त्यासोबतच या डाळीच्या पाण्यात व्हिटॅमिन बी१, बी५, बी६, थियामिन, डायटरी फायबर आणि रेजिस्टेंट स्टार्चही भरपूर असतं.

कसं बनवाल मूग डाळीचं पाणी?

मूग डाळीचं पाणी तयार करण्यासाठी कुकरमध्ये दोन कप पाणी गरम करा. या गरम पाण्यात मूग डाळ टाका आणि चवीनुसार मीठ टाकून साधारण २ ते ३ शिट्या होईपर्यंत शिजवा. त्यानंतर डाळ चांगली बारीक करा. यातील पाणी वेगळं काढा. तुमचं डाळीचं पाणी पिण्यासाठी तयार आहे.

लठ्ठपणा कमी होतो

बदलती लाइफस्टाईल आणि धावपळीच्या जीवनामुळे आजकाल लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. लोकांना लठ्ठपणाची समस्या जास्त होत आहे. तुम्हालाही लठ्ठपणा कमी करायचा असेल तर मूग डाळीच्या पाण्याचं सेवन सुरू करा. याने मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. ज्यामुळे वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते.

विषारी पदार्थ बाहेर काढा

मूग डाळीचं पाणी नियमित सेवन केल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. सोबतच या डाळीचं पाणी प्यायल्याने लिव्हर, गॉल ब्लॅडर, रक्त आणि आतड्यांची स्वच्छताही होते.

डायबिटीसमध्ये फायदेशीर

मूग डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला डायबिटीस असलेल्या रूग्णांना दिला जातो. कारण मूग डाळीचं पाणी शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासोबतच मूग डाळ ब्लड ग्लूकोजला नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. ज्याने डायबिटीस नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.

डेंग्यूपासून बचाव

पावसाळा आला की, डासांची समस्या वाढते. या दिवसात डेंग्यू होण्याचा धोकाही जास्त असतो. अशात मूगाच्या डाळीचं पाणी सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. या डाळीचं पाणी सेवन करून इम्यून सिस्टम बूस्ट होतं, ज्याने डेंग्यूसारख्या गंभीर आजारापासून बचाव होतो.

लहान मुलांना आवर्जून द्या

मूग डाळीच्या पाण्यात अनेकप्रकारचे पोषक तत्व असतात, जे लहान मुलांसाठी फार फायदेशीर असतात. सर्वात खास बाब ही आहे की, या डाळीचं पाणी सहजपणे पचतं. या डाळीने लहान मुलांची इम्यून पॉवर वाढते आणि त्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. ज्यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून त्यांचा बचाव होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

2 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

16 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

16 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

16 तास ago

भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…

16 तास ago

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…

16 तास ago