महाराष्ट्र

आमदार रोहित पवार यांच्यावरील गुन्हा म्हणजे सत्य लपवण्याचा आणि प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संतप्त निषेध

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात पोलिसांशी गैरवर्तन केल्याच्या कथित कारणावरून दाखल करण्यात आलेला गुन्हा हा केवळ एक राजकीय सूडभावनेचा भाग असून, सत्य परिस्थिती झाकण्यासाठी मुद्दाम तयार केलेले नाट्य आहे.

घटनाक्रम काय होता?पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, आमचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर पाच हल्लेखोरांनी अचानक जीवघेणा हल्ला केला. त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. ही घटना संपूर्ण सीसीटीव्हीमध्ये कैद आहे. तरीही आश्चर्य म्हणजे केवळ नितीन देशमुख यांना अटक करण्यात आली, तर चार आरोपी मोकाट फिरत आहेत. याच अन्यायकारक अटकेच्या चौकशीसाठी आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर आम्ही आझाद मैदान पोलीस ठाण्यालाही भेट दिली.

व्हायरल व्हिडीओ अपूर्ण आणि दिशाभूल करणारा!आज सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहे, तो फक्त एक बाजू दाखवतो.आमदार रोहित पवार यांनी पोलिसांना फक्त आपल्या कार्यकर्त्याबाबत विचारणा केली होती. त्यावर PSI गोपणे यांनी अपमानास्पद भाषा वापरत आमदारांना हात वारे करून पोलीस स्टेशनच्या बाहेर जाण्यास सांगितले.”तो इथे नाही, चौकीत आहे” अशा उडवाउडवीच्या उत्तरांनी आणि उद्धट वागणुकीमुळे वातावरण चिघळले.संपूर्ण व्हिडीओ बाहेर येण्याऐवजी, केवळ एक टोकाचे दृश्य व्हायरल करून आमदारांची प्रतिमा मलीन केली जात आहे.सत्य लपवले जात आहे आणि खोटे पसरवले जात आहे.

साक्षीदाराचा खुलासा ॲड. अमोल मातेले मुंबई अध्यक्ष“मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. आमदार रोहित दादा केवळ आपल्या कार्यकर्त्याची चौकशी करत होते. पण PSI गोपणे यांनी त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. त्यांचा वापरलेला सुर, देहबोली आणि शब्द हा आमदारासोबत पोलिसांना शोभेल असा नव्हता. हे सर्व व्हिडीओत आहे पण फक्त आमच्या प्रतिक्रियेचा भाग दाखवून जनतेला गाफिल केले जात आहे.” ॲड. अमोल मातेले, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (मुंबई शहर) प्रश्न सरकारला गुन्हेगार मोकाट आणि आमदारांवर गुन्हे?हल्लेखोर अजूनही मोकाट का? फक्त विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक का?शांतपणे चौकशी करणाऱ्या आमदारावरच गुन्हा का?ही सगळी कारवाई म्हणजे सरकारची विरोधकांवर दबाव टाकण्याची रणनीती आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा आंदोलन अटळ!जर हल्लेखोरांना अटक झाली नाही आणि आमदार रोहित पवार यांच्यावरचा गुन्हा मागे घेतला नाही, तर नरिमन पॉईंट पोलीस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी दिला आहे.

आमचा आवाज बंद करता येणार नाही

जनतेसमोर खरे चित्र मांडण्यासाठी आणि आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही न्यायालयीन आणि जनआंदोलन दोन्ही मार्गांनी लढा देऊ.लोकशाहीमध्ये विरोधाचा आवाज दाबणाऱ्या सरकारविरोधात हे रण आता रस्त्यावर होईल!

ॲड. अमोल मातेले

मुंबई अध्यक्ष

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

7 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

7 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

7 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

15 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

16 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

16 तास ago