पुण्यात वाहतूक पोलिसानं गळफास घेऊन स
पुणे: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. ते पुणे शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते.
एकटेपणाचा फायदा घेत आत्महत्या
शनिवार, साप्ताहिक सुट्टी असल्याने राजेंद्र गायकवाड घरीच होते. त्यांच्या पत्नी दौंड येथे गेल्या होत्या, तर १२ व १४ वर्षांची मुले शाळेत होती. दुपारी पत्नीने अनेक वेळा फोन केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ती चिंतेत होती.
शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती
शाळा सुटल्यावर मुले घरी परतली तेव्हा घर बंद होते. त्यांनी ही माहिती शेजाऱ्यांना दिली. शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. विमानतळ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा उघडताच घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत गायकवाड आढळून आले.
आत्महत्येचं कारण अस्पष्ट
राजेंद्र गायकवाड यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमानतळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…