महाराष्ट्र

कलेक्टरला आलेला फोन थेट पालकमंत्र्यांनी उचलला अन्‌….

कराड: राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे (दि. 07 ऑगस्ट) सातारा दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना लॅंडलाईन फोन खणखणला. तो थेट मंत्री शंभूराज देसाई यांनी उचचला आणि अनेक दिवसांपासून पेडिंग असणारे कराड तालुक्यातील मलकापूर येथील वकिलाचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर थेट कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन लावत संबंधित वकिलाचे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्यातून शंभूराज देसाई यांची कार्यतत्परताही दिसून आली.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद सुरू होती. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवरील फोन खणखणला. तो वाजणारा फोन नेमका पालकमंत्री देसाई यांनी उचला. कोण बोलतंय, असं पालकमंत्री विचारत असतानाच समोरील व्यक्तीने कराडमधून बोलत असल्याचे सांगितले. देसाई यांनी संबंधित व्यक्तीला तुम्हाला काय पाहिजे, अशी विचारणा केली

समोरून बोलणाऱ्या व्यक्तीला नेमकं कोणाशी बोलायचं आहे, हे सांगता येत नव्हते. त्यामुळे पालकमंत्री त्यांना जिल्हा अधीक्षक…भूमिअभिलेख…. तलाठी…..तलाठी अध्यक्ष ऑफीस होय, असं विचारत होते. तलाठी अध्यक्ष म्हणजे तलाठी संघटना हो. ती तलाठ्यांची खासगी संघटना आहे, म्हणजे त्यांची वेगळी संघटना आहे. तुमचं कलेक्टरांकडे काय काम आहे, सांगा, अशी विचारणा शंभूराज देसाई यांनी संबंधित व्यक्तीकडे केली.

फोनवर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने ७/१२ दुरुस्तीचे काम असल्याचे सांगितले. त्यानुसार शंभूराज देसाई यांनी तुमचा ७/१२ दुरुस्तीची काम करायचं आहे होय, अशी विचारणा केली. आपल्या स्वीय सहायकांडे लिहिण्याची खून करत ‘पीए हात घालना खिशात, पेन काढ ना’ असे आदेश सोडले. कुठल्या गावचा ७/१२ दुरुस्त करायचा आहे. तेव्हा त्यांनी कराड तालुक्यातील मलकापूरचा करायचा आहे, असे सांगितले.

सर्व्हे/गट नंबर काय आहे. संबंधित व्यक्तीने गट नंबर सांगितला. मलकापूरचा तलाठी तुम्हाला दुरुस्त करून देत नाही का, अशी विचारणा केली. समोरच्या व्यक्तीने तो माहितीच देत नसल्याचे सांगितले. तुम्हा कऱ्हाडच्या प्रांताधिकाऱ्यांना भेटलात का, अशी विचारणा केली. समोरच्या व्यक्तीने तहसीलदाराला भेट असल्याचे सांगितले. तेव्हा तुमचं नाव सांगा, अशी विचारणा शंभूराज देसाई यांनी केली. तेव्हा समोरील व्यक्तीने आपण ॲड. एस. पी. शहा बोलत असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा मंत्री शंभूराज देसाई यांनी तुम्ही ॲडव्होकेट आहात, असे आश्चार्याने विचारले.

समोरच्या व्यक्तीने जेव्हा आपण ॲड. एस. पी. शहा बोलत असल्याचे सांगितले, तेव्हा ‘मी शंभूराज देसाई बोलतोय, पालकमंत्री’ अशी आपली ओळख सांगितली. मी कलेक्टरच्या चेंबरमध्ये बसलोय आणि तुमचा मी डायरेक्ट उचलला. तुमचं काम करतो मी, कऱ्हाडच्या प्रांताधिकाऱ्यांना बोलतो मी, असे ॲड शहा यांना सांगितले. देसाई तेवढ्यावरच थांबले नाही तर बघा पालकमंत्री किती तत्पर आहे, डायरेक्ट फोन उचलतात की नाही. धन्यवाद म्हणत त्यांनी फोन ठेवत असतानाच पीएला कराडच्या प्रांतांना फोन लावण्यास सांगितले.

मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने कराडच्या प्रांतांना फोन लावत ॲड शहा यांचे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्या मॅटरमध्ये काय वाद आहे का, अशीही विचारणा त्यांनी प्रांतांना केली. तेवढा काम मार्गी लावा, बघा तेवढं, अशी सूचना त्यांनी कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

12 मिनिटे ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

4 तास ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

8 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

22 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

1 दिवस ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

1 दिवस ago