महाराष्ट्र

देवमाणूसच्या सेटवर आई–लेकाचं नातं जिवंत

अपर्णा क्षेमकल्याणी यांनी ऑनस्क्रीन लेकासाठी विणला खास मफलर

मुंबई: मालिका आणि चित्रपटांमधील कलाकारांचे पडद्यामागील नाते कसे असते, याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. सोशल मीडियामुळे आता हे नातेसंबंध, त्यामधील आपुलकी आणि भावूक क्षण चाहत्यांसमोर येत आहेत.

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस मधला अध्याय सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिकेतील गोपाळ, लाली, आप्पा, सुधाकर, रंजना, हृतिक, इन्स्पेक्टर जामकर यांसारखी पात्रे प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसत आहेत. प्रत्येक पात्राची बोलण्याची ढब, वागणूक आणि डायलॉग्ज विशेष चर्चेत आहेत.

मालिकेत गोपाळचा मोठा भाऊ सुधाकर ही भूमिका अभिनेता रोहित भोसले साकारत आहे, तर त्याच्या आईची रंजना ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री अपर्णा क्षेमकल्याणी यांनी साकारली आहे. या ऑनस्क्रीन आई–लेकाच्या नात्याने आता ऑफस्क्रीनदेखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

अपर्णा क्षेमकल्याणी यांनी रोहितसाठी स्वतःहून एक मफलर विणला. विशेष म्हणजे, हा मफलर त्यांनी सेटवर मिळेल त्या वेळेत विणला. याचा एक भावूक व्हिडीओ रोहितने सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यासोबत एक मन हेलावणारी पोस्टही लिहिली आहे.

रोहितने पोस्टमध्ये लिहिले आहे,”आयुष्यात पहिल्यांदा मी माझं बर्थडे गिफ्ट बनताना नाही, तर विणताना पाहिलं. त्या मफलरमध्ये मी तुझं प्रेम, माया आणि आपुलकी ओतलेली पाहिली आहे. पुढे आयुष्यात कधी गोंधळलो, कधी आतून थंड पडलो, तर हा मफलर मला कायम ऊर्जित करेल.”

पुढे तो म्हणतो,”दोन श्वासांच्या अंतरातसुद्धा तू तुझं वेगळं विश्व निर्माण करतेस. असं गिफ्ट आयुष्यात पहिल्यांदाच मिळालं आहे. तुझ्याकडून मिळालेलं हे गिफ्ट मी फक्त स्वीकारत नाही, तर मनापासून अंगीकारतो.”शेवटी रोहितने, “तुझाच सुधी – सुध्या – सुधाकर – रोहित. खूप खूप धन्यवाद, खूप खूप प्रेम” असे लिहीत आपली भावना व्यक्त केली आहे.या पोस्टवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.“शेवटी आईनं आपल्या पोरालाच दिलं”,“आई ती आईच असते”,अशा भावूक कमेंट्ससह अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत या नात्याचं कौतुक केलं आहे.देवमाणूसच्या सेटवर फुललेलं हे आई–लेकाचं नातं सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

45 मिनिटे ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

49 मिनिटे ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

54 मिनिटे ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

4 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

13 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

13 तास ago