महाराष्ट्र

चिमुकला धावत आईकडे आला अन् कुशीतच घेतला शेवटचा श्वास, नेमक काय घडल

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं एक अत्यंत धक्कदायक आणि सर्वांच्याच काळजाला चटका लावणारी धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहेय कोडोली येथील दहा वर्षाच्या श्रावण अजित गावडे या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

गणपती मंडळामध्ये खेळत असताना अचानक त्रास जाणवू लागल्यानं, तो पळत घरी जाऊन आईच्या कुशीत विसावला आणि तिथेच त्यानं अखेरचा श्वास घेतला. अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकल्याचा हृदयविकारानं बळी गेल्यानं, कोडोली आणि परिसरामध्ये सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

नेमक काय घडल

कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या वैभवनगरमध्ये अजित गावडे हे आपल्या कुटुंबासह राहत होते. गुरुवारी संध्याकाळी अजित गावडे यांचा दहा वर्षाचा मुलगा, श्रावण हा गणपती मंडळामध्ये इतर लहान मुलांबरोबर खेळत होता.

खेळता खेळता त्याला अचानक त्याला काही तरी त्रास होऊ लागला. त्यामुळे तो पळत-पळत घरी गेला. यावेळी त्याने आपल्या आईला सांगितलं की, त्याला काही तरी त्रास होतो आहे. पण असं सांगत असतानचा तो त्याच्या आईच्या कुशीत गेला. ज्यानंतर अवघ्या काही क्षणाच्या आत त्याने आईच्या कुशीमध्येच अखेरचा श्वास घेतला. तीव्र स्वरूपाच्या हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान मनमिळाऊ आणि खेळकर स्वभावाच्या श्रावणचा अचानक मृत्यू झाल्यानं, गावडे कुटुंबीयावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. संपूर्ण कुटुंबाला या घटनेने प्रचंड धक्का बसला आहे. अजित गावडे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्यं होती. त्यांच्या मुलीचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता आणि आता एकुलता एक श्रावणचाही अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं गावडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

लहान मुलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण का वाढत आहे

लहान मुलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढण्याची अनेक कारणे आहेत, ज्यात जन्मजात हृदयविकार आणि जीवनशैलीशी संबंधित हृदयविकारांचा समावेश होतो. खालीलप्रमाणे कारणे आणि माहिती यांचा तपशील आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

11 तास ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

12 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

1 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

1 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

1 दिवस ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

1 दिवस ago