मेंदूचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरतात. यामध्ये भिजवलेली खसखस आणि अक्रोड रोजच्या आहारात समाविष्ट करणं उपयुक्त आहे. खसखस ही मेंदूला थंडावा देणारी असून तिच्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि हेल्दी फॅट्स असतात. सकाळी भिजवून घेतलेली खसखस मेंदू शांत ठेवते आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते.
अक्रोडला ब्रेन फूड म्हटलं जातं, कारण त्यात भरपूर प्रमाणात ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे मेंदूच्या पेशींना पोषण देऊन, त्याचं वृध्दत्व कमी करतं. रोज सकाळी १ ते २ अक्रोड खाल्ल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढते, विचारशक्ती सुधारते आणि स्मरणशक्ती अधिक तीव्र होते. विशेषतः विद्यार्थी, मानसिक काम करणारे लोक किंवा ज्यांना लक्ष केंद्रित करण्यात अडचण होते, त्यांनी हा उपाय नक्कीच करावा. हे दोन्ही घटक नैसर्गिक असल्यामुळे शरीरावर कोणताही साइड इफेक्ट न करता मेंदूला आवश्यक पोषण पुरवतात. झोपेत सुधारणा, तणाव कमी होणं, आणि मानसिक स्थैर्य यासाठीही खसखस व अक्रोड उपयुक्त आहेत. दीर्घकालीन उपयोगाने मन प्रसन्न राहतं, आणि मानसिक थकवा दूर होतो. त्यामुळे मेंदूचं आरोग्य जपण्यासाठी हा सोपा आणि नैसर्गिक मार्ग नित्याने करण्या सारखा आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…
मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…