महाराष्ट्र

हे 3 प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावेत; प्रा. राम शिंदे

मुंबई: विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्वीत करण्यात आलेल्या संगणक कार्यप्रणालीसंदर्भात सन्माननीय सदस्यांना सुयोग्य पध्दतीने अवगत करण्यात यावे. सभागृह कामकाजातील सन्माननीय सदस्यांचा सहभाग वाढावा यादृष्टीने सर्वोतपरी मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे सन्माननीय सदस्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत तत्परतेने कार्यवाही व्हावी, सध्या बांधकाम सुरू असलेले मनोरा आमदार निवास, मॅजेस्टीक आमदार निवास आणि अजिंठा बंगला हे नुतनीकरणाचे प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण होण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंतिक दक्षता घ्यावी, असे निदेश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

काल (दि. ९) जानेवारी रोजी विधान भवन, मुंबई येथे विधानमंडळ कामकाज आढावा घेण्यासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव-२ (कार्यभार) डॉ. विलास आठवले आणि विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी वर्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नूतन मनोरा आमदार निवासचे बांधकाम सुरू झाले असून त्यामध्ये सभागृह, वाचनालय, अद्ययावत वाहनतळ, सुसज्ज भोजन कक्ष, सदस्य आणि सहायकांसाठीची प्रशस्त निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. मॅजेस्टीक आमदार निवासचे देखील वारसा वास्तूवैभव कायम ठेऊन अतिशय देखणे असे नुतनीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रामुख्याने पीठासीन अधिकारी यांच्या निवासासाठी मलबार हिल येथे “अजिंठा” इमारतीची सुसज्ज वास्तू उभारण्यात येत आहे. ही सर्व बांधकामे विहित मुदतीत पूर्ण व्हावीत आणि सन्माननीय सदस्यांना तातडीने त्याचा लाभ प्राप्त व्हावा यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने उचित कार्यवाही करावी अशा सूचना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या बैठकीत दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

13 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

13 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

14 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

19 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

19 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

19 तास ago