आरोग्य

केसांतला कोंडा म्हणजे काय, कारणे व उपाय

केसांत कोंडा होणे ही अगदी सर्रास दिसणारी तक्रार. ८-१० वर्षांच्या मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत कुणाच्याही डोक्यात कोंडा होऊ शकतो. हा कोंडा होतो कसा आणि डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी त्यावर घरच्या घरी काही उपाय करता येईल का याविषयी माहिती..

केसातला कोंडा म्हणजे काय?

डोक्यावरची त्वचा सतत नवीन पेशींची निर्मिती करत असते. जुन्या पेशी मृत होऊन गळून पडतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेतात. तापमानात वाढ होते तशी या पुर्ननिर्माण प्रक्रियेची गती वाढते. अधिक प्रमाणात आणि सतत पेशींचे गळून पडणे सुरू होते. त्यामुळे केसांमध्ये काही वेळा पांढऱ्या छोटय़ा आकाराचे किंवा कधी खपल्यांसारखे निघालेले त्वचेचे थर दिसतात. केसातले हे त्वचेचे थर म्हणजेच कोंडा. केस कोरडे असतील तर हा कोंडा केस विचरताना पडतो. तेलकट केसांमध्ये डोके खाजवल्यावर तो सुटा होऊन दिसू लागतो.

केसात कोंडा झाल्यानंतर

केसांच्या मुळाशी त्वचेचे थर अडकल्यामुळे तिथली त्वचा आणि केसही तेलकट होतात.

सतत डोक्याला खाज येते. डोक्यात मुंग्या चालताहेत अशी संवेदना होते. डोक्याच्या त्वचेवर लालसर चट्टे दिसू शकतात. केस गळू लागतात.

कोंडा होण्याची इतर कारणे

१) बुरशीचा संसर्ग: डोक्यावरची त्वचा सतत ओलसर राहिली तर त्वचेला बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे केसांत कोंडा होतो.

२) ऍलर्जी: तेल, साबण, शँपू यामुळे किंवा अगदी प्रदूषणातील काही घटकांमुळे होणाऱ्या अ‍ॅलर्जीनेही कोंडा होऊ शकतो.

३) केसांमधील उवा: केसांत उवा झाल्या असतील तरी कोंडा होऊ शकतो. उवांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या घटकांमुळे डोक्यावरच्या त्वचेचे आरोग्य धोक्यात येते.

४) इतर त्वचाविकार: इसब (एक्झेमा), सोरायसिस अशा काही त्वचाविकारांमुळेही डोक्यात कोंडा होऊ शकतो.

५) मेथीच्या पुडीला पाण्यात टाकूण लेप तयार करावा आणि तो डोक्यावर लावावा. एक तासानंतर डोकं धुवून घ्यावे.

६) केस धुतांना लिंबाचा रस वापरल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.

७) बीटची मुळं पाण्यात घालून पाणी उकळावं आणि त्या पाण्याने रोज रात्री डोक्याला मसाज करावा.

८) दोन-तीन दिवसाचे शिळे (आबंट दही), थोडासा लिंबाचा रस, व्हिनिगर आणि आवळ्याचा रस यांच्या वापरानेही कोंडा कमी करता येतो.

९) थंड पाण्याने केस धुवून अत्यंत जोराने केसांना मुळापर्यंत बोटांनी घासणे यामुळे केस गळती आणि कोंडा होत नाही.

घरच्या घरी उपाय काय 

मेथीच्या दाण्यांची पेस्ट करून केसांच्या मुळांशी लावावी व धुऊन टाकावी

सिताफळाच्या बियांचे चूर्ण विकत मिळते. त्याची पेस्ट करून रोज अर्धा तास केसांच्या मुळांशी लावून ठेवावी व धुवून टाकावी.

गरम केलेल्या खोबरेल तेलात भीमसेनी कापूर घालावा आणि हे तेल गार करून त्याने केसांना मालिश करावी.

तमालपत्राची (तेजपान) ७-८ पाने एक कप पाण्यात उकळून घेऊन त्या पाण्याने केस धुवावेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago