महाराष्ट्र

तृतीयपंथीयांचे आयुष्य सुकर व्हावे; रुपाली चाकणकर

राज्यात प्रथमच रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष वॅार्ड, राज्य महिला आयोगाच्या संकल्पनेला यश

मुंबई: समाजात स्त्री- पुरुष यांना मिळणारे अधिकार, मान तृतीयपंथी व्यक्तींना ही मिळायला हवे. त्यांचे जगणे सुकर व्हायला हवे, वेळप्रसंगी वैद्यकीय उपचारांची गरज भासल्यास रुग्णालयात ही त्यांना स्वतंत्र अस्तित्व असावे, त्यांची देखभाल केली जावी यासाठी तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष असावा या राज्य महिला आय़ोगाच्या संकल्पनेला यश येत असल्याचे आय़ोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. आज मुंबईतील जी. टी. रुग्णालयातील विशेष कक्षाचे लोकार्पण होत आहे.

तृतीयपंथी व्यक्तींना रुग्णालयात उपचार घेण्याच्या वेळी स्त्री अथवा पुरुष कक्षात दाखल केले जाते. काही वेळा कुठल्या कक्षात दाखल केले जावे यावरुन गोंधळ ही होतो. या सगळयामुळे तृतीयपंथी व्यक्तींची कुंचबणा, गैरसोय होत असते. हे थांबवण्यासाठी त्यांना सन्मानाने वैद्याकीय उपचार मिळणे आवश्यक आहे.

राज्य महिला आय़ोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाला दिलेल्या प्रत्यक्ष भेटी वेळी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॅार्ड किंवा २५ विशेष बेड असावे अशी सुचना केली होती. वेळोवेळी रुग्णालय अधिष्ठाता यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. त्याअनुषंगाने रुग्णालयाने त्रिसदस्यीय समिती स्थापन करुन त्यांचा अहवाल आल्यानंतर तृतीयपंथीयांकरिता स्वतंत्र १५ खाटांचा कक्ष तयार करण्याचे काम सुरु केले. या कक्षाचे काम पुर्णत्वास आले असून लवकरच कार्यान्वित होणार आहे.

ससून, जी.टी या रुग्णालयांप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांनी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करत त्यांचे जगणे सुकर करावे असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago