महाराष्ट्र

ज्येष्ठ गायक-अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ शास्त्रीय गायक, नाट्यसंगीताचे अभ्यासक आणि अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचे शनिवारी गुवाहाटी येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. सहलीच्या निमित्ताने ते गुवाहाटी येथे गेले असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचे पार्थिव रविवारी दुपारपर्यंत मुंबईत आणण्यात येणार असून दुपारी अडीचनंतर ठाणे पश्चिम येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी प्रज्ञा, कन्या प्राची व दीपा, मुलगा निनाद, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

पं. लिमये यांना नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक पं. वसंतराव देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. तब्बल बारा वर्षे त्यांनी गुरुकुल पद्धतीने वसंतरावांकडे संगीताचे शिक्षण घेतले. ‘कट्यार काळजात घुसली’ या गाजलेल्या नाटकात त्यांनी ‘चांद’ ही भूमिका साकारली, तर पुढे ‘खाँसाहेब आफताब हुसेन’ ही वसंतरावांनी लोकप्रिय केलेली भूमिका देखील त्यांनी यशस्वीपणे रंगविली. वसंतराव देशपांडे यांनी त्यांना आपल्या गायकीचे उत्तराधिकारी मानले होते.

संगीताचा वारसा त्यांना आई-वडिलांकडून लाभला. विविध घराण्यांच्या अनेक दिग्गज गुरूंकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. त्यांच्या गायकीत ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्यांच्या परंपरेचा प्रभाव दिसून येत होता.

सन २००० मध्ये त्यांनी ‘वसंतराव देशपांडे संगीत सभा’ची स्थापना करून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य केले. या संस्थेमार्फत ‘होरी के रंग’, ‘श्रुतीरंग’, ‘शाकुंतल ते कट्यार’, ‘नाट्यरंग’ आणि ‘हवेली संगीत’ यांसारखे अनेक दर्जेदार कार्यक्रम सादर करण्यात आले.

पं. लिमये यांना ‘सूरमणी’, ‘महाराष्ट्र वैभव’, ‘स्वर रंगराज’ यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. केंद्र सरकारची शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ‘सीनियर फेलोशिप’ देखील त्यांना प्राप्त झाली होती. कॅनडा व अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतावर व्याख्याने व सादरीकरणे केली होती.

देशभरातील विविध संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी आपल्या गायकीचा ठसा उमटविला. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव, कुमार गंधर्व सोहळा, संगीत नाटक अकादमीचे कार्यक्रम तसेच विविध राष्ट्रीय संगीत संमेलनांमध्ये त्यांच्या मैफली विशेष गाजल्या.

‘भक्तीयात्रा’ या मराठी अभंगांच्या ध्वनिमुद्रिकेद्वारे त्यांनी भक्तिसंगीत रसिकांपर्यंत पोहोचविले. ‘जयध्वनी’ हा जोडराग आणि ‘चंद्र मोहिनी’ हा स्वतंत्र राग त्यांनी निर्माण केला होता. तसेच अनेक बंदिशी व तराण्यांची रचनाही त्यांनी केली. अभिनय क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान देत ‘आजचा दिवस माझा’ या मराठी चित्रपटात अंध गवयाची भूमिका साकारली होती.

पं. चंद्रकांत लिमये यांच्या निधनाने शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि मराठी सांस्कृतिक क्षेत्रातील एक समृद्ध परंपरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…

7 तास ago

‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणार’; शिंदेंचा निर्धार, परभणीत उबाठाला मोठा धक्का

परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…

7 तास ago

खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…

7 तास ago

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…

23 तास ago

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…

23 तास ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

23 तास ago