महाराष्ट्र

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतातील सुवर्ण पर्वाचा अस्त

मुंबई: ज्येष्ठ गायिका Suman Kalyanpur यांच्या निधनाने संगीत विश्वातील एक दैदिप्यमान सुवर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, स्वरांमधून भावना व्यक्त करण्याची विलक्षण ताकद लाभलेला एक अमूल्य आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत, बालगीत तसेच हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रात सुमन कल्याणपूर यांनी अजरामर ठसा उमटवला. त्यांच्या सुरेल आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने अनेक पिढ्यांचे भावविश्व समृद्ध केले असून जगभरातील संगीतप्रेमींच्या हृदयात त्यांनी कायमचे स्थान निर्माण केले.

साधेपणा, नम्रता आणि संगीताप्रती असलेली त्यांची निष्ठा हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे नमूद करत, त्यांच्या कुटुंबीयांना व असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

4 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

11 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

12 तास ago