महाराष्ट्र

दीपक काटेचा गॉडफादर कोण?

मुंबई: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करत हल्ला करण्यात आला. या प्रकरणी प्रवीण गायकवाड यांनी बुधवारी (दि. १६) रोजी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले.

मास्टरमाईंड कोण? हे मी पुराव्यानिशी सांगितलं आहे. गुन्हेगाराला मुक्त सोडून माझ्या हत्येसाठी पाठवले, असा आरोप गायकवाड यांनी केला. ज्याचा बंदोबस्त करायचा त्याला जशास तसे उत्तर देणार, ही या सरकारच्या शेवटाची सुरुवात आहे. तुम्ही हल्लेच करणार असाल तर ती तुमची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले.

दीपक काटे याने माझ्यावर हल्ला केला. या प्रकरणी आयोजकाकडून कुठलीही पोलिस तक्रार नोंदवली नाही. काटे याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याने स्वतःच्या भावाच्या खुनापासून शिक्षा भोगली आहे. त्याच्यावर जवळपास खंडणीपासून अनेक गंभीर गुन्हे आहेत. त्याला भाजपच्या युवा मोर्चाचे सरचिटणीसपद दिले आहे. बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असताना दीपक कुटे त्यांच्यासोबत सतत दिसले असल्याचे सांगत गायकवाड यांनी तशा व्हिडिओ क्लीपही पत्रकार परिषदेत दाखवल्या.

‘जामीनावर सुटल्यावर काटने गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला’

विमानतळावर काटेला २ पिस्तूल, २८ काडतूसे सापडल्या प्रकरणी अटक झाली. अशा परिस्थितीत त्याला जामीन देता येत नाही, असे असताना तपास अधिकाऱ्याने न्यायालयात खोटी माहिती दिली. न्यायालयासमोर काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आणली नाही. ज्या आरोपीला मोका लावणे गरजेचे आहे त्याला मुक्त सोडले गेले. मुक्त सोडल्यानंतर त्याने गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला, असेही गायकवाड यांनी सांगितले.

पोलीस ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नाही. पोलिसांचा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. संघपरिवारात ज्या संघटनांचा बंदोबस्त करावा असे सांगितले. त्यात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणखी काही संघटना आहेत. ‘४०० पार, शत प्रतिशत भाजप’च्या आड आम्ही येतो म्हणून आमच्यावर हल्ला केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

4 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

4 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

4 तास ago

दीड महिन्यापूर्वीच लग्न; भीमाशंकर दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…

4 तास ago

शिक्षक दिनी मलठण सोसायटीकडून गुरुजनांचा गौरव

शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…

5 तास ago

दहीहंडीचा थरार ठरला जीवघेणा! मुंबई-नवी मुंबईत दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू; १६८ गोविंदा जखमी

मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…

5 तास ago