कोल्हापूर: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आता इनकमिंग सुरू केले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या कारभार्यांसह काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मुबंईत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पवार, राष्ट्रवादीचे उत्तम कोराणे, जसुराज्य शक्तीकडून विधानसभा लढविलेले संताजी घोरपडे यांच्यासह 16 कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
मुंबईत भाजप मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापुरातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका सरस्वती पवार, माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक बोंद्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांच्यासह रिक्षा संघटनेचे नेते राजेंद्र थोरवडे, वैभव राजेभोसले, सुशांत सावंत, अभिजित माने, दीपक खांडेकर, मंदार राऊत, संकेत रूद्र, विलास इंदप, देवेश कुबल, सुदर्शन वोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी, पक्षाची ध्येयधोरणे समजून घ्या, जनहिताच्या कामात अग्रेसर राहा, असे आवाहन केले. भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढत असली तरी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. खासदार महाडिक यांनी कोल्हापुरातील अजून काही कार्यकर्ते भाजपमध्ये येणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी नगरसेवक जयंत पाटील, मुरलीधर जाधव, विश्वराज महाडिक उपस्थित होते.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…