महाराष्ट्र

पक्षपाती पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग का हटवत नाही

निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकीसाठी वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तात्काळ हटवा

मुंबई: विधानसभेच्या निवडणुका सुरु झाल्या असतानाही निवडणूक आयोगाने अद्याप पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले नाही. काँग्रेस पक्षाने रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती पण त्याकडे आयोगाने दुर्लक्ष केले आहे. पश्चिम बंगाल व झारखंडच्या पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली असता त्यांना तात्काळ बदलण्यात आले पण महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना याच निवडणूक आयोगाने अद्याप हटवले नाही. रश्मी शुक्ला या वादग्रस्त व भारतीय जनता पक्षाला मदत करणाऱ्या अधिकारी आहेत, त्या पदावर असल्याने निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पडतील असे वाटत नाही त्यामुळे त्यांना पदावरून तात्काळ हटवावे, या मागणीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुनरुच्चार केला आहे.

निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, काँग्रेस पक्षाने २४ सप्टेंबर २०२४ व ४ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्र पाठवून रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. २७ सप्टेंबर रोजी निवडणुक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणे व त्यांना नाहक त्रास देण्याचे फर्मान पोलीस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना सोडले आहे, पोलीस यंत्रणा विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची अडवणूक करत आहेत, त्यांच्यावर दबाव आणत आहेत, धमक्या देत आहेत. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती याआधीही वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते, शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर त्यांना पोलीस महासंचालक पदावर नियुक्त करण्यात आले आणि निवृत्तीनंतरही त्यांना नियमबाह्य पद्धतीने कार्यकाल वाढवून दिला आहे. निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवणे गरजेचे आहे, आयोगाने त्यांना तात्काळ हटवावे, असे नाना पटोले म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

23 मिनिटे ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

30 मिनिटे ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

35 मिनिटे ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

41 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

3 तास ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

5 तास ago