महाराष्ट्र

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातील राजकीय चुरस वाढली आहे. लोकमंगल बँकेच्या माध्यमातून भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांचा मतदार प्रतिनिधी म्हणून ठराव झाल्याने त्यांच्या डीसीसीतील प्रवेशाची दावेदारी मजबूत झाली आहे.

सुभाष देशमुख यांच्या नावाची भर पडल्याने या मतदारसंघातील इच्छुकांची संख्या वाढली आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी संचालक म्हणून काम पाहिले होते. शिंदे यांनी १९८५ ते २००० या काळात माढा सोसायटी मतदारसंघातून तीन टर्म डीसीसीचे संचालकपद भूषविले. त्यानंतर माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सोसायटी मतदारसंघातून डीसीसीत प्रवेश केला.

२०१० आणि २०१५ मध्ये बबनराव शिंदे यांनी माढेश्‍वरी अर्बनच्या माध्यमातून नागरी बँका मतदारसंघातून डीसीसीत प्रवेश केला होता. मात्र, आगामी निवडणुकीसाठी माढेश्‍वरी अर्बन बँकेचा ठराव अद्याप झालेला नाही. त्यामुळे यावेळी बबनराव शिंदे यांचा पुन्हा ठराव होणार की त्यांचे पुत्र तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांना संधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील रुक्मिणीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतून भाजपचे प्रांतिक सदस्य आणि माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचाही ठराव झाला आहे. त्यामुळे भाजपमधील दोन प्रमुख नेत्यांचे ठराव झाल्याने पक्षाकडून अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

११ सप्टेंबरपर्यंत ठरावाची मुदत

मतदार प्रतिनिधींचे ठराव करण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे या कालावधीत आणखी कोणकोणत्या इच्छुकांचे ठराव होतात, यावर या मतदारसंघातील उमेदवारीची समीकरणे ठरणार आहेत.

या मतदारसंघात नागरी बँका, नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, पगारदार नोकर पतसंस्था, पाणीपुरवठा संस्था, कंझुमर्स, औद्योगिक तसेच अन्य मतदारसंघात समावेश न झालेल्या संस्थांचा समावेश होतो.

जिल्ह्यात ७९६ नागरी बँका व पतसंस्था आणि ७८५ इतर संस्था सभासद आहेत. जिल्ह्यातील १,५९२ सभासद संस्थांपैकी १,४१३ संस्था मतदार प्रतिनिधींचा ठराव करण्यास पात्र आहेत.

दोन्ही देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष

डीसीसीच्या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख कोणती भूमिका घेतात, याकडेही सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून पॅनेलची रचना कशी होते, कोणाला उमेदवारी मिळते आणि कोणाला सबुरीचा सल्ला दिला जातो, यावर निवडणुकीतील समीकरणे अवलंबून राहणार आहेत.

माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह दोन्ही देशमुख बंधूंच्या भूमिकेलाही या निवडणुकीत महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय पात्र सभासद

तालुका

सभासद

अक्कलकोट

६०

बार्शी

११२

करमाळा

५३

माळशिरस

१७८

माढा

१३६

मंगळवेढा

७१

मोहोळ

९५

पंढरपूर

७२

सांगोला

१०५

उत्तर सोलापूर

४८९

दक्षिण सोलापूर

४२

एकूण

१,४१३

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…

2 तास ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

2 तास ago

पुण्यात मुलाकडून आईची निर्घृण हत्या; घरातच दार बंद करून चाकूने हल्ला, विश्रांतवाडीत खळबळ

पुणे : जन्म देऊन आयुष्यभर सांभाळ करणाऱ्या आईचीच मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी…

2 तास ago

गांधी नकोत, पण गांधींचा चष्मा हवा!

परदेशात ‘ब्रँड इंडिया’, देशात गांधीविरोध; हा राजकारणाचा दुटप्पीपणा की सोयीचा इतिहास? मुंबई: महात्मा गांधींचे नाव…

5 तास ago

गोकुळच्या निवडणुकीआधी महायुतीत धुसफूस; मुश्रीफ-महाडिक गटाचा संघर्ष टोकाला

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक…

1 दिवस ago

गडचिरोलीच्या विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्ती लुटण्याचा डाव; वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

गडचिरोली: उद्योगांच्या माध्यमातून गडचिरोलीचा कायापालट करण्याच्या घोषणा सत्ताधाऱ्यांकडून केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते,…

2 दिवस ago