मुंबई: सरकारने एकूण किती डास पकडले..? डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले..? यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का..? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का..? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची अक्षरशः भंबेरी उडाली.
पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली यावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले, व डास घनता काढली असे उत्तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज सभागृहात दिले. मात्र या उत्तराने प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने यावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी डासांचे वर्गीकरण आणि विच्छेदन यावर प्रश्न केले मात्र आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना याचे योग्य उत्तर देता आले नाही. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अचानक आलेल्या या प्रश्नांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत गोंधळले आणि सभागृहात एकच हशा पिकला.
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…