राजकीय

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे पक्ष प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेस प्रदेशाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री अनिस अहमद आदी नेते उपस्थित होते.

रणजित शिरोळे यांच्यासोबत उरण येथील भाजपाचे पदाधिकारी यशवंत म्हात्रे, आम आदमी पक्षाचे थॉमस मॅथ्यू, सामाजिक कार्यकर्ते जयेश ठाकूर, कृष्णा श्रीवास्तव आणि सेधुरमण अय्यर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशातील राजकीय वातावरण बदलत असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर सर्व स्तरांतून विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. दिवाळीची सुरुवातच पक्षप्रवेशाचे फटाके फोडून झाली आहे. आगामी काळात अनेक तरुण आणि उमदे नेतृत्व काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस प्रवेशानंतर रणजित शिरोळे यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. शिरोळे कुटुंबाचा काँग्रेस विचारांशी जुना ऋणानुबंध आहे. हाच वैचारिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असून पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काँग्रेसचे विचार घराघरांत पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे रणजित शिरोळे यांनी सांगितले.

या पक्षप्रवेशामुळे मुंबईसह उरण परिसरातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून मनसे, भाजप आणि आम आदमी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस प्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

1 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

2 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

2 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

2 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

2 दिवस ago

५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा! फडणवीसांना हर्षवर्धन सपकाळांचे खुले आव्हान

महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल; ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुंबई: राज्यातील…

2 दिवस ago