राजकीय

अरे शिवरायांचा इतिहास आठवा, भगतसिंग कोश्यारीच पार्सल घरी पाठवा

मुंबई: अरे शिवरायांचा इतिहास आठवा, भगतसिंग कोश्यारीचं पार्सल घरी पाठवा. काळ्या टोपीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय… तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय… राज्यपाल हाय हाय… अशा गगनभेदी घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सीएसएमटी येथे जोरदार आंदोलन केले.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवती अध्यक्षा अदिती नलावडे युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, उपाध्यक्ष बाप्पा सावंत, उत्तर – पश्चिम जिल्हाध्यक्ष अर्शद आमीन, मुंबादेवी तालुकाध्यक्ष प्रविण ठाकूर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अयुब मेमन, ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष विजय देसाई, विद्यार्थी राष्ट्रीय सचिव मनोज टपाल, दक्षिण मध्यच्या महिला जिल्हाध्यक्षा समृद्धी जंगम, पूजा पवार, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे आदींसह युवक, विद्यार्थी व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या आंदोलनासह राज्यातील तालुका, जिल्हा ठिकाणी राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. हिंगोली येथे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पुण्यात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

4 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

4 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

4 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

19 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago