राजकीय

गुजरातच्या भूमीपुत्रांसाठी लढणाऱ्या मनसेला धडा शिकवा

मुंबई: महाराष्ट्रातील भूमीपुत्रांचा रोजगार गुजरातला पळविणाऱ्या व शिवसेना पक्ष फोडण्याचे पाप करणाऱ्या भाजपला बिनशर्त पाठींबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जोरदार हल्ला चढविला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माहिम विधानसभेचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारार्थ दादरच्या खांडके बिल्डिंग परिसरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या मतदारसंघात ३ उमेदवार आहेत. त्यातले जिंकून येणारे उमेदवार माझ्या सोबत इथे उभे आहेत, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी महेश सावंत यांच्या विजयाचा व्यक्त केला.

मराठी माणसांसाठी लढणारा पक्ष, भूमीपुत्रासांसाठी लढणारा पक्ष अशी मनसेची ओळख होती मात्र आता ती गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढणारा पक्ष अशी ओळख झाली आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी मनसेवर केली. राज्यातील 5 लाख भूमिपुत्रांचा रोजगार गुजरातला पळविणाऱ्या, एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडण्याचा काम केलं. अशावेळी मराठी तरुणांच्या रोजगारासाठी आवाज उचलण्यासाठी मनसे गल्लीबोळात का दिसली नाही असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

गणोशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकीत गोळीबार केला ना मग येत्या 24 तारखेला आमच सरकार आल्यावर तुमच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करणार, असा सज्जड इशारा आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता सदा सरवणकर यांना दिला. बदलापूर गुन्ह्यामध्ये एफआयआर लवकर घेतला नाही, वारकऱ्यांवर व मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. गेले दोन वर्षे ही महाराष्ट्राची लढाई म्हणून लढत आलो. महाविकास आघाडीच्या न्याय हक्कासाठी लढत आलो आहे. असे असताना मनसे केवळ गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

कोळीवाडयांचे सीमांकन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात झाले. मात्र त्यावर क्लस्टर डेव्हलपमेंट आणण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यावेळी कोणी विरोध केला का असा सवाल करत सत्ता आल्यावर मुंबईला हात लावून देणार नाही असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

निवृत्त पोलिसांना घर देण्याच काम सत्ता आल्यावर करणार असून जनतेची सेवा करायची आहे असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले. शिवसेना ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, खासदार अनिल देसाई, सचिव साईनाथ दुर्गे, महिला उपनेत्या विशाखा राऊत, माजी नगरसेविका प्रिती पाटणकर , माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर,काँग्रेसचे नेते राजन भोसले, आप आदमी पार्टीच्या प्रणाली राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद शेणकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते मिलिंद रानडे, स्टार प्रचारक प्रियंका पाटील आदी उपस्थित होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ज्येष्ठ शिवसैनिक अरुण (काका) कुलकर्णी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यांनी खांडके बिल्डिंग मध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी येथील रहिवाशांना आदित्य ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

4 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

4 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

4 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

4 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

5 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

10 तास ago