राजकीय

मुंबई महापालिकेवर २५ वर्षांची ठाकरे यांची सत्ता संपुष्टात; महायुतीला काठावरचे बहुमत

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या २०२५–२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय इतिहासाला कलाटणी देणारा निकाल लागला असून, महायुतीने काठावरचे बहुमत मिळवत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. गेल्या तब्बल २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांच्या शिवसेनेला यंदा पराभव स्वीकारावा लागला आहे.

या निवडणुकीत एकूण ५४,६४,४१२ वैध मते नोंदवली गेली, तर ११,६७७ मते टपाली मतदानाद्वारे पडली. अधिकृत आकडेवारीनुसार विविध पक्षांना मिळालेली मते व टक्केवारी पाहता मुंबईतील बदलती राजकीय समीकरणे स्पष्टपणे समोर आली आहेत.

भाजप सर्वात मोठा पक्ष; २१.५८ टक्के मतदारांचा कौल

भारतीय जनता पार्टी (भाजप) या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे ८९ उमेदवार विजयी झाले असून, पक्षाला एकूण ११,७९,२७३ मते मिळाली आहेत. ही मते एकूण मतदानाच्या २१.५८ टक्के आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

उद्धव ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; पारंपरिक प्रभाव कायम

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. या गटाचे ६५ नगरसेवक विजयी झाले असून, त्यांना ७,१७,७३६ मते मिळाली आहेत. ही मते एकूण मतदानाच्या १३.१३ टक्के आहेत. सत्ता गेली असली तरी मुंबईतील शिवसेनेचा पारंपरिक मतदारवर्ग अजूनही कायम असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.

शिंदे गट तिसऱ्या स्थानावर; ५ टक्के मतदान

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. पक्षाचे २९ उमेदवार विजयी झाले असून, त्यांना २,७३,३२६ मते मिळाली आहेत. एकूण मतदानात शिंदे गटाचा वाटा ५ टक्के आहे.

काँग्रेसला २४ जागा; मनसेची मर्यादित पण ठळक उपस्थिती

इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाला २४ जागांवर विजय मिळाला असून, काँग्रेसला २,४२,६४६ मते मिळाली आहेत. ही मते एकूण मतदानाच्या ४.४४ टक्के आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने ६ जागा जिंकत पुन्हा एकदा मुंबईच्या राजकारणात आपली उपस्थिती दाखवून दिली आहे. मनसेला ७४,९४६ मते मिळाली असून, हा वाटा १.३७ टक्के आहे.

इतर पक्षांची कामगिरी

AIMIM – ८ जागा, ६८,०७२ मते (१.२५%)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) – ३ जागा, २४,६९१ मते

समाजवादी पार्टी – २ जागा, १५,१६२ मते

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) – १ जागा, ११,७६० मते

राजकीय समीकरणात मोठा बदल

या निकालामुळे मुंबईच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दीर्घकाळ सत्तेत असलेली ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच महापालिकेच्या सत्तेबाहेर गेली असून, महायुतीसमोर आता मुंबईच्या कारभाराची मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

21 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago