शिरूर तालुका

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या घरात चोरी झाल्याने श्वान पथकाच्या सहाय्याने परिसराची कसून तपासणी

पोलीस निरीक्षकांच्या आईसह महिलेच्या गळ्यातील दागिने लांबवले

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील कमळजाई नगर येथे एका सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या घरात आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन पोलीस निरीक्षकाच्या आईसह शेजारील एका महिलेच्या घरात घुसून दोघा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

धामारी (ता. शिरुर) येथील कमळजाई नगर येथे राहणारे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक संपत निर्मळ हे घरात झोपलेले असताना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे त्यांच्या आईचा ओरडण्याचा आवाज आल्याने निर्मळ हे त्यांच्या आईच्या खोलीकडे गेले असता दरवाजा उघडा तसेच घरातील साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे दिसले, तर आईच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने गळ्यातील दागिने लांबवल्याचे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक संपत निर्मळ यांच्या आईने सांगितले.

याबाबतची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजीत पठारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, अनिल ढेकणे, विजय चौधर, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, गणेश सुतार, पोलीस नाईक राहुल वाघमोडे, किशोर शिवणकर, रोहिदास पारखे, लखन शिरसकर, विकास मोरे यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता तेथे चोरट्यांची चप्पल मिळून आल्याने श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असता श्वान पथकातील पोलीस शिपाई सागर रोकडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह दुर्गा श्वानाला सोबत घेत घटनास्थळाची पाहणी केली यावेळी शेजारील वस्तीवरील लक्ष्मीबाई डफळ यांच्या गळ्यातील देखील दागिने चोरट्यांनी अशाच प्रकारे पळवल्याची माहिती समोर आली.

सदर घटनेत चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक संपत निर्मळ यांची आई गीताबाई निर्मळ यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे दागिने तर लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर डफळ यांच्या गळ्यातील दिड तोळा वजनाचे मणी मंगळसूत्र चोरुन नेले असून याबाबत सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक संपत गुलाब निर्मळ (वय ६५) रा. धामारी कमळजाई नगर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

6 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

12 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

12 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

13 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

13 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

13 तास ago