टाकळी हाजी ग्रामपंचायत कडून घर तेथे कचराकुंडीचे मोफत वाटप
शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरुर) ग्रामपंचायती मार्फत गावठाणातील प्रत्येक घर, सरकारी कार्यालये आणि दुकाने या ठिकाणी कचराकुंडी (डस्टबीन) चे घरपोच वाटप करुन एक पाऊल स्वच्छतेकडे उपक्रम राबविण्यात येत आहे. पंधराव्या वित्त आयोगातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबी मधून कचरा मुक्त आणि स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ निवडीनंतर पहिल्याच झालेल्या ग्रामसभेत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सुमारे 2 हजार डस्टबिन खरेदी केल्याचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी सांगितले.
नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने त्यांच्या निवडीनंतर पहिल्याच दिवशी झाडू हातात घेऊन बस स्टँड परिसर स्वच्छ केला होता. ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ व प्रशासन यांनी काही ग्रामस्थांसह निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच सातारा जिल्ह्यातील स्वच्छ व आदर्श गाव निढळ ग्रामपंचायतला भेट देऊन परिसराची आणि त्यांनी राबविलेल्या योजनांची माहिती घेवून एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
गावच्या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे गावास जोडणाऱ्या प्रत्येक प्रमुख रस्त्यांवर आणि गावातील चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरु आहे. माहिती माजी सरपंच दामूशेठ घोडे यांनी दिली. यापूर्वी टाकळी हाजी ग्रामपंचायतचे सरपंच तसेच शिरुर पंचायत समितीचे सदस्य आणि या वेळी पुन्हा सरपंच असा राजकीय अनुभव असल्यामुळे या अनुभवाच्या जोरावर गावच्या विकासासाठी माजी गृहमंत्री व शिरुर आंबेगाव चे लोकप्रतिनिधी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या वैभवात भर घालण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी बगीचा, क्रीडांगण तसेच ठीक ठिकाणी टॉयलेट आणि हँडवॉश स्टेशन उभारणी करण्याचा मनोदय आहे.
सरपंच अरुणाताई दामूशेठ घोडे
‘लोकतंत्र बचाव’च्या नावाखाली काँग्रेसकडून लोकशाहीबाबत संभ्रम; व्होट चोरीच्या आरोपांवर पुरावे देण्याचे शिंदेंचे आव्हान ठाणे :…
नांदेडच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही; १०० बेडचे रुग्णालय २०० बेडचे करण्याचे निर्देश, शेतकऱ्यांना…
रिक्षाचालक ते उपमुख्यमंत्री; संघर्ष, संघटनकौशल्य, लोकसंपर्क आणि विकासाभिमुख वाटचालीचा प्रेरणादायी प्रवास मुंबई: नेतृत्व हे केवळ…
एक आरोपी हरियाणातून, तर दुसरा विश्रांतवाडीतून जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर…
सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…
कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…