शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी अभिषेक शेळके यांची बिनविरोध निवड

कारेगाव (तेजस फडके): महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या भक्तीचे श्रद्धास्थान पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असणाऱ्या ‘श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट’ च्या अध्यक्षपदी पिंपरी दुमाला गावचे सामाजिक कार्यकर्ते अभिषेक दादाभाऊ शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सोमवारी झालेल्या बैठकीत या अगोदरचे अध्यक्ष सुनील अनंथा सोनवणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर कोणाची नियुक्ती करायची याबाबत विश्वस्त मंडळाची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते अभिषेक शेळके यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळामध्ये सुनिल सोनवणे, शेखर पाटेकर, कैलास पिंगळे, अरुण कळसकर, कैलास बडदे, डॉ श्रीकांत सोनवणे हे कार्यरत असुन सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे करण्यात हे विश्वस्त मंडळ यशस्वी ठरले आहे.

महाराष्ट्रातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या पिंपरी दुमाला येथील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट हे ऐतिहासिक यात्रा सोहळा तसेच विविध जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून माणुसकी समृद्ध करण्याचा सोहळा साजरा करत असते. सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भक्तांना सुख सुविधा देण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम देखील सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट नेहमी राबवित असते. माझ्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट व मंदिर परिसरातील महत्त्वाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

अभिषेक शेळके (अध्यक्ष)

श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट

पिंपरी दुमाला

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

2 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

17 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

23 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

23 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago