शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील IDBI बँकेत चोरीचा प्रयत्न: गुन्हे दाखल

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील IDBI बँकेत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून बँकेमध्ये प्रवेश करुन बँकेतील केबिन व लॉकरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपींवर चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत कार्यालयच्या इमारतीत IDBI बँक असून (दि. २२) जुलै रोजी बँकेचे अधिकारी व कर्मचारी बँक बंद करुन घरी गेले होते २ दिवस सुट्टी असल्याने (दि. २४) जुलै रोजी बँकेचे अधिकारी व कर्मचारी बँकेत आले असता त्यांना बँकेच्या मुख्य शटरचे कुलूप तुटलेले दिसून आले. यावेळी त्यांनी बँकेमध्ये आतमध्ये जाऊन प्रवेश करत पाहणी केली असता बँकेच्या अधिकाऱ्याची केबिन तसेच बँकेचे लॉकर देखील चोरट्यांनी फोडले असल्याचे दिसून आले. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले, तर चोरट्यांचा चोरीचा डाव देखील फसल्याचे दिसून आले.

याबाबत नितीनकुमार जगन्नाथ लगाडे (वय ४२) रा. देहू रोड बापदेव नगर हाउसिंग सोसायटी पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

7 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

7 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

7 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

22 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago