क्राईम

एका सख्या भावाकडूनच शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे एका सख्या भावाकडूनच आपल्या सख्या बहिण व भावासह भाच्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे साहेबराव धोंडीभाऊ सावंत या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील संगीता कोबल हि महिला घरात असताना तिचा भाऊ साहेबराव सावंत तेथे आला आणि महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत या घरात राहायचे नाही, असे म्हणून लागला यावेळी सदर महिलेचा मुलगा अक्षय घराबाहेर येऊन साहेबराव यांना तुम्ही शिवीगाळ का करता, असे म्हणाला असता साहेबराव यांनी अक्षयला मारहाण केली.

दरम्यान संगीता व साहेबराव यांचाच दुसरा भाऊ बाजीराव भांडणे सोडवण्यासाठी आला असता साहेबराव याने त्याला देखील दमदाटी करत मारहाण करुन तोंडाने चावा घेत जखमी केले. याबाबत संगीता कैलास कोबल (वय ४५) रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी साहेबराव धोंडिभाऊ सावंत रा. वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष पवार हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

4 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago