शिरूर तालुका

कामातून स्वतःची ओळख निर्माण करा; शिक्षणाधिकारी संजय नाईकडे

शिरुर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे संजय नाईकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती शिरुर शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी (दि. २२) जानेवारी रोजी तालुकास्तरावर सेफ्टी ॲण्ड सिक्युरिटी या विषयावर विजयमाला इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मुख्याध्यापकांना संबोधित करताना शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले की, शाळेमध्ये विद्यार्थी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाही याची मुख्याध्यापकांनी नेहमी दक्षता घ्यावी. त्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा शाळा स्तरावर उभी करावी. विद्यार्थी आई – वडील व शिक्षक यांचे अनुकरण करत असतात त्यामुळे शिक्षकांनी नेहमी आपल्या आचरण शुद्ध व वर्तन चांगले ठेवावे. शैक्षणिक गुणवत्तेबद्दल बोलताना ते म्हणाले की काही ठराविक शाळा शिष्यवृत्ती व विद्यार्थी गुणवत्तेसाठी चांगले काम करत आहेत. पट जास्त असूनही गुणवत्ता वाढीसाठी तेथील शिक्षक चांगले काम करत आहेत. याउलट काही शाळेत अतिशय निराशाजनक चित्र आहे, अशा शाळांकडे यापुढे लक्ष दिले जाईल.

बीटस्तरावर मुख्याध्यापकांची दरमहा सभा आयोजित करून गुणवत्तेचा व शाळा स्तरावर सुरू असलेल्या उपक्रमांचा विस्तार अधिकारी यांनी आढावा घ्यावा. प्रत्येक शाळेने गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवावा. शिक्षकांनी समाजाशी संपर्क ठेवून शाळेसाठी लोक सहभाग मिळवावा. शिक्षकांनी आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण करुन गुणवत्तेचे सार्वत्रिकरण करावे अशा सूचना त्यांनी केल्या.

शिक्षकीपेशामुळे आज शिक्षकांना समाजात सन्मान, प्रतिष्ठा मिळत आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती बांधिलकी जपली पाहिजे. शिक्षकाजवळ क्वालिटी असली पाहिजे. आपले ज्ञान सतत अद्यावत ठेवले पाहिजे. शाळा हे मंदिर व विद्यार्थी हे दैवत मानून मनापासून शिक्षकाने काम करावे. नियमित व्यायाम करावा. वय वर्ष ५० नंतर नियमितपणे आपल्या आरोग्याची तपासणी करावी, अशा मौलिक सूचनाही त्यांनी केल्या.

सेफ्टी व सिक्युरिटी कार्यक्रमाचे पुणे जिल्हा समन्वयक अक्षय वाडनकार व तालुका समन्वयक दिनेश पालवे यांनी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला असून विद्यार्थ्यांना घर ते शाळा आणि शाळा ते घरापर्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. हिंसाचार, शाळा सुरक्षा, आपत्ती प्रतिबंधात्मक उपाय, बाल संरक्षण, आरोग्य व स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सर्व शाळांना सुरक्षापोस्टर किटचे वाटप करण्यात आले.

शिरुर गटशिक्षणाधिकारी. बी. एन कळमकर यांनी १०० दिवस कृती कार्यक्रम व आदर्श शाळा निर्मिती याविषयी आणि विस्तार अधिकारी के .बी. खोडदे यांनी प्रशासकीय बाबींविषयी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. वंदना शिंदे यांनी आभार मानले. यावेळी विस्ताराधिकारी रघुनाथ पवार, काळुराम चकोर व सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोंढापुरीत तरुणावर चाकूने वार करत खून; शिक्रापुर पोलिसांनी १२ तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास…

18 तास ago

घोड धरणातील वाळूमाफियां विरोधात वडगाव-शिंदोडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून,…

23 तास ago

शिरुर पोलिस ऍक्शन मोडवर ‘राजहंस लॉज’ वर छापा टाकत अनधिकृत ‘वेश्या’ व्यवसाय प्रकरणी एका पत्रकारासह दोघांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची…

1 दिवस ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

3 दिवस ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

3 दिवस ago

टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश

मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…

3 दिवस ago