शिरूर तालुका

डॉ. प्रकाश उचाळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात शेतकरी, दुधउत्पादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आमदार गावडे यांच्याकडून कार्याची प्रशंसा

शिरूर (अरुणकुमार मोटे): “डॉ. प्रकाश उचाळे यांनी आपल्या सेवाकार्यातून केवळ पशुधनाचेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जीवनातही आनंद फुलविला आहे. दुधउत्पादन वाढवण्याच्या दिशेने त्यांनी दिलेले योगदान खरोखरच अनुकरणीय आहे,” असे गौरवोद्गार शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी काढले.

कवठे येमाई (ता. शिरूर) येथे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश उचाळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते. या वेळी अनेक मान्यवर, पदाधिकारी, शेतकरी आणि दुधउत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात जुन्नर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष पाडुरंग पवार, माजी सभापती सुनिता गावडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, सेवानिवृत्त आयुक्त डॉ. डी. डी. परकाळे, नाशिकचे उपायुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी, सहाय्यक आयुक्त एन. एम. पवार, सोपानराव भाकरे, अरुणा घोडे, कल्पना पोकळे, प्रभाकर गावडे, बाबाजी गावडे, जिल्हा कृषी अधिकारी संजय पिंगट, भास्कर उचाळे, उत्तम जाधव, सावित्रा थोरात, सुदाम ईचके, सरपंच ज्योती मुंजाळ, हौसीराम मुखेकर, बन्सी घोडे, बाळासाहेब डांगे, दिपक दुडे, शिवाजी घोडे, कानिफनाथ हिलाल, डॉ. हेमंत पवार, दिनकर घोडे, दत्ता जोरी, बाळासाहेब फिरोदिया,हरीश्चंद्र शिंदे, नामदेव लंघे,विठ्ठल मुंजाळ, संदीप गायकवाड, अविनाश पोकळे, नलिनी खर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहु साबळे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार स्वप्नील उचाळे यांनी मानले.

उपस्थितांची गर्दीच कार्याचा सन्मान..

या सत्कार समारंभाला परिसरातील शेतकरी आणि दुधउत्पादकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. उपस्थित शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त गर्दीतूनच डॉ. प्रकाश उचाळे यांच्या कार्याची समाजातील पोचपावती स्पष्टपणे दिसून आली. या वेळी ज्येष्ठ नेते पाडुरंग पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी याविषयी मनोगत व्यक्त करत त्यांच्या कार्याची भरभरून प्रशंसा केली.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. उचाळे यांच्या प्रदीर्घ आणि निस्वार्थ सेवेचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे शेती आणि दुग्ध व्यवसायातील शेतकऱ्यांना दिशा मिळाली असून, त्यांचे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे मत यावेळी सर्व उपस्थितांनी व्यक्त केले.

कवठे येमाई (ता. शिरूर) येथे आयोजित सेवानिवृत्ती समारंभात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश उचाळे यांचा माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. परकाळे, डॉ. धर्माधिकारी आणि अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

11 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

17 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

17 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

18 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

18 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

18 तास ago