शिरूर तालुका

शिरूरचे डॉ. राजेंद्र दुगड यांना ‘लाईफटाईम अचिव्हमेंट आंतरराष्ट्रीय हस्तरेषा तज्ञ पुरस्कार प्रदान

अहमदाबाद येथे ज्योतिष महाकुंभ संमेलनात भव्य सन्मान

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्याचे ज्योतिष शास्त्र व हस्तरेषा क्षेत्रातील नामांकित तज्ञ डॉ. राजेंद्र बाबूलाल दुगड यांना लाईफटाईम अचिव्हमेंट हस्तरेषा तज्ञ पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय हस्तरेषा तज्ञ,ज्योतीष’ हस्तरेषा विद्वान गोल्ड मेडल अवॉर्ड पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा भव्य पुरस्कार अहमदाबाद (गुजरात) येथे आयोजित ‘ज्योतिष महाकुंभ मेळावा 2025’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संमेलनात प्रदान करण्यात आला आहे.

या संमेलनात आंतरराष्ट्रीय ज्योतिष व लालकिताब तज्ञ डॉ. अनिल वत्स आणि डॉ. नीता जानी यांच्या हस्ते डॉ. दुगड यांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्र व शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे शिरूर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. राजेंद्र दुगड यांनी 1984 पासून हस्तरेषा शास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि सतत प्रयोगशीलतेच्या जोरावर या क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त केले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना 2019 साली हस्तरेषा शास्त्रात पीएच.डी. (डॉक्टरेट पदवी) बहाल करण्यात आली होती. त्याच वर्षी त्यांनी गोल्ड मेडलिस्ट अवॉर्ड देखील मिळवला होता. त्यांनी हजारो जणांच्या जीवनातील अडचणींवर मार्गदर्शन करत अचूक भविष्यवाणी व हातातील रेषांमधून व्यक्तिमत्त्व विश्लेषणाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

डॉ. दुगड यांचा हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून, शिरूर तालुक्याच्या वैभवात भर घालणारा ठरला आहे. अनेक समाजसेवक, ज्योतिषप्रेमी, शिष्यवर्ग व स्थानिक नागरिकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून, त्यांच्याकडून आगामी काळातही मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

17 मिनिटे ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

15 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

21 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

21 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

22 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

22 तास ago